indian cricket team
indian cricket team  google
क्रीडा | T20 WC

IND vs AFG: पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचे हे ३ स्टार अफगाणिस्तानवर पडू शकतात भारी

Ankush Dhavre

Key Players In IND vs AFG 1st T20I:

भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज रंगणार आहे. हे दोन्ही संघ पहिल्यांदाच टी-२० मालिका खेळण्यासाठी आमने सामने येणार आहेत.

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेनंतर रोहित शर्मा टी-२० क्रिकेट खेळताना दिसून आला नव्हतात. तो १ वर्षानंतर आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ही मालिका टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे.दरम्यान या भारतीय संघात ३ असे खेळाडू आहेत जे गेमचेंजर ठरु शकतात.

यशस्वी जयस्वाल..

यशस्वी जयस्वाल अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात हुकमी एक्का ठरु शकतो. पहिल्या टी-२० सामन्यात तो रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. तो संघाला आक्रमक सुरुवात करुन देऊ शकतो. गेल्या १५ टी-२० सामन्यांमध्ये त्याने ४३० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत . (Latest sports updates)

रवी बिश्नोई..

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेत दवाचे प्रमाण अधिक असल्याचं पाहायला मिळेल. त्यामुळे फिरकी गोलंदाज अडचणीत येऊ शकतात.असं असतानाही रवी बिश्नोई अफगाणिस्तानच्या फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरु शकतो.

त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत अप्रतिम गोलंदाजी केली होती. या मालिकेत त्याने ९ फलंदाजांना माघारी धाडलं होतं. त्याची आतापर्यंतची कामगिरी पाहिली तर त्याने २१ टी-२० सामन्यांमध्ये ३४ गडी बाद केले आहेत.

रिंकू सिंग...

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी निवृत्त झाल्यानंतर भारतीय संघाला एका चांगल्या फिनिशरची गरज होती. त्यानंतर रिंकू सिंगचं भारतीय संघात कमबॅक झालं आणि त्याने आपल्या छोट्याश्या कारकिर्दीत आपल्या आक्रमक फलंदाजी स्टाईलने सर्वांची मनं जिंकली आहेत.

त्याला जास्त चेंडू खेळण्याची संधी मिळत नाही. मात्र तो जितके चेंडू खेळतो त्यामध्ये तो सामना फिरवून टाकतो. रिंकूने आतापर्यंत १२ टी-२० सामन्यांमध्ये १८०.६९ च्या स्ट्राईक रेटने २६२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक झळकावलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Adivasi Vikas Vibhag: आदिवासी विकास विभागात विविध रिक्त पदांसाठी भरती, शिक्षणाची अट आणि वयोमर्यादा किती? जाणून घ्या...

India Places Name Speciality: भारतातील ठिकाणांच्या नावांची विशेषता जाणून घ्या; तुमचे गाव यात आहे का ?

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात; ट्रक दुभाजक तोडून थेट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला!

Maharashtra Live News Updates : 'संविधान आमची सगळ्यात मोठी प्रेरणा', PM मोदी

Sanjay Raut News : Eknath Shinde वाघ नव्हे लांडगा, कातडं फाटणार, राऊतांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT