indian cricket team twitter
Sports

IND vs AUS,Highlights: पराभवाचा बदला घेतला! ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडत टीम इंडियाची सेमिफायनलमध्ये धडक

India vs Australia, Match Highlights: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये निर्णायक लढत पार पडली. या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाविरुद्ध खेळताना ट्रेविस हेडची बॅट चांगलीच तळपते. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी जातात, मात्र ट्रेविस हेड शेवटपर्यंत टिकून राहतो. असंच काहीसं चित्र भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सुपर ८ च्या सामन्यात पाहायला मिळालं. सेमिफायनलमध्ये जाण्यासाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर २०६ धावांचं आव्हान ठेवलं होतं. या धावांचा पाठलाग करताना हेडने पूर्ण जोर लावला. मात्र यावेळी बाजी भारतीय गोलंदाजांनी मारली आणि ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव केला. यासह भारतीय संघाने सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे.

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २०६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना डेव्हिड वॉर्नरच्या रुपात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. त्यानंतर हेडने संघाचा डाव सांभाळला. कर्णधार मिचेल मार्शने ३७ धावा केल्या. तर ग्लेन मॅक्सवेल २० धावा करत माघारी परतला. हेडने पुन्हा एकदा भारतीय संघाची डोकेदुखी वाढवली होती. मात्र शेवटी जसप्रीत बुमराहने त्याला ७६ धावांवर बाद करत माघारी धाडलं.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिल. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना विराट कोहली आणि रोहित शर्माची जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी आली. मात्र विराट कोहली या सामन्यातही फ्लॉप ठरला. तो ५ चेंडू खेळून शून्यावर माघारी परतला. मात्र रोहित शर्माने पहिल्या चेंडूपासूनच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. त्याने मिचेल स्टार्कवर हल्लाबोल करत एकाच षटकात २८ धावा चोपल्या.

यादरम्यान त्याने टी -२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० षटकार पूर्ण केले. त्याला वेगवान शतक झळकावण्याची संधी होती. मात्र तो ४१ चेंडूत ९२ धावा करत माघारी परतला. त्यानंतर रिषभ पंतने १५, सूर्यकुमार यादवने ३१ धावा केल्या. शेवटी शिवम दुबेने २२ चेंडूंचा सामना करत २८ धावांची खेळी केली. तर हार्दिक पंड्याने १७ चेंडूंचा सामना करत महत्वपूर्ण २७ धावा चोपल्या. भारतीय संघाने दमदार सुरुवात केली होती. मात्र शेवट गोड करता आला नाही. भारतीय संघाला २० षटकअखेर ५ गडी बाद २०५ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT