David Warner: बाद होताच डेव्हिड वॉर्नरने ओमानच्या ड्रेसिंग रुमच्या दिशेने घेतली धाव; नेमकं काय घडलं? - Video

David Warner Funny Video: ओमानविरुद्धच्या सामन्यात बाद होताच डेव्हिड वॉर्नरने ओमानच्या ड्रेसिंग रुमच्या दिशेने धाव घेतली. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
David Warner: बाद होताच डेव्हिड वॉर्नरने ओमानच्या ड्रेसिंग रुमच्या दिशेने घेतली धाव; नेमकं काय घडलं? - Video
David warnertwitter

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील १० व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि ओमान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नरसोबत एक मजेशीर घटना घडली आहे. अर्धशतक झळकावल्यानंतर तो ओमानच्या ड्रेसिंग रुममध्ये जाताना दिसून आला. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने २० षटकअखेर ५ गडी बाद १६४ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आला होता. सलामीला फलंदाजी करताना त्याने ५१ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि १ षटकार मारला.

अर्धशतक झाल्यानंतर डेव्हिड वॉर्नर कलिलमुल्लाहच्या गोलंदाजीवर बाद होऊन माघारी परतला. मात्र ज्यावेळी तो बाद होऊन मैदानाबाहेर जात होता, त्यावेळी तो चुकून ओमानच्या ड्रेसिंग रुमच्या दिशेने जात होता. तो ड्रेसिंग रुमच्या दिशेने वाटचाल करत होता त्यावेळी कोणीतरी त्याला इशारा केला. त्यावेळी त्याने माघार घेतली. हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

David Warner: बाद होताच डेव्हिड वॉर्नरने ओमानच्या ड्रेसिंग रुमच्या दिशेने घेतली धाव; नेमकं काय घडलं? - Video
IND vs PAK, Playing XI: पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार; या खेळाडूचं होणार कमबॅक

पहिल्या डावात फलंदाजी करताना सुरुवातीच्या १० षटकात ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडला होता. अवघ्या ५० धावांवर संघातील ३ फलंदाज माघारी परतले होते. मात्र त्यानंतर मार्कस स्टोइनिस आणि डेव्हिड वॉर्नरने मिळून संघाचा डाव सांभाळला. मार्कस स्टोइनिस ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने फलंदाजी करताना १८६ च्या स्ट्राईक रेटने ३६ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि २ षटकार खेचले.

David Warner: बाद होताच डेव्हिड वॉर्नरने ओमानच्या ड्रेसिंग रुमच्या दिशेने घेतली धाव; नेमकं काय घडलं? - Video
IND vs PAK: भारत- पाक सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आलं मोठं कारण

मार्कस स्टोइनिसने डेव्हिड वॉर्नरसोबत मिळून १०२ धावांची भागीदारी केली. ही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी चौथ्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर खेळताना केलेली दुसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ९ गडी बाद १२५ धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियाने हा सामना ३९ धावांनी आपल्या नावावर केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com