AUS vs OMAN: 'कॅच ऑफ द टूर्नामेंट',ओमानच्या कर्णधाराने डाईव्ह मारत टिपला भन्नाट झेल

Aqib Ilyas Catch Video: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ओमानच्या कर्णधाराने भन्नाट झेल टिपला आहे.ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
AUS vs OMAN: 'कॅच ऑफ द टूर्नामेंट',ओमानच्या कर्णधाराने डाईव्ह मारत टिपला भन्नाट झेल
aus vs omaninstagram

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील १० व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि ओमान हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने एकतर्फी खेळ करत ओमानवर ३९ धावांनी विजय मिळवला आहे. हा सामना जरी ऑस्ट्रेलियाने जिंकला असला तरीदेखील ओमानच्या कर्णधाराने एक भन्नाट कॅच पकडत सर्वांचं मन जिंकलं आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ओमानचा कर्णधार आकिब इलियासने पकडलेल्या कॅचचा व्हिडिओ आयसीसीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. क्रिकेट फॅन्सने या कॅचला 'कॅत ऑफ द टूर्नामेंट' असं म्हटलं आहे.

तर झाले असे की,ऑस्ट्रेलियाचा संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्यावेळी पहिल्या डावाती ९ वे षटक टाकण्यासाठी मेहरान खान गोलंदाजीला आला होता. या षटकातील तिसरा चेंडू आऊटसाई़ड ऑफच्या दिशेने टाकला. मॅक्सवेलने पहिल्याच चेंडूवर ऑफ साईडच्या दिशेने शॉट मारला. मात्र ऑफ साईडला क्षेत्ररक्षण करत असलेल्या आकिब इलियासने डाईव्ह मारली आणि एका हाताने भन्नाट कॅच पकडला. हा कॅच पाहून ग्लेन मॅक्सवेलही शॉक झाला. यासह ग्लेन मॅक्सवेल गोल्डन डकवर बाद होऊन माघारी परतला.

AUS vs OMAN: 'कॅच ऑफ द टूर्नामेंट',ओमानच्या कर्णधाराने डाईव्ह मारत टिपला भन्नाट झेल
IND vs PAK, Playing XI: पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार; या खेळाडूचं होणार कमबॅक

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर ओमानने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर ऑस्ट्रेलियाने ५ गडी बाद १६४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून प्रथम फलंदाजी करताना मार्कस स्टोइनिसने सर्वाधिक ६७ धावांची खेळी केली. तर सलामीला आलेल्या डेव्हिड वॉर्नरने ५६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ओमानला २० षटकअखेर ९ गडी बाद १२५ धावा करता आल्या. यासह ऑस्ट्रेलियाने या सामन्यात ३९ धावांनी विजय मिळवला.

AUS vs OMAN: 'कॅच ऑफ द टूर्नामेंट',ओमानच्या कर्णधाराने डाईव्ह मारत टिपला भन्नाट झेल
IND vs PAK: भारत- पाक सामन्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! समोर आलं मोठं कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com