David Warner Viral Video: डेव्हिड वॉर्नरही रामाच्या भक्तीत तल्लीन! 'जय श्री राम' च्या घोषणा देतानाचा Video व्हायरल

David Warner Jai Shree Ram Chant Video: आयपीएल २०२४ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतीत दाक्षिणात्य संघ एकमेकांसोबत भिडताना दिसून येणार आहेत.
david warner chants jai shree ram ahead of ipl 2024 video breaks the internet
david warner chants jai shree ram ahead of ipl 2024 video breaks the internet twitter

David Warner Jai Shree Ram Video:

आयपीएल २०२४ स्पर्धेला आजपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतीत दाक्षिणात्य संघ एकमेकांसोबत भिडताना दिसून येणार आहेत. चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील ओपनिंगचा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी दोन्ही संघातील खेळाडू कसुन सराव करताना दिसून येत आहेत. या सामन्यापूर्वी डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

डावखुऱ्या हाताचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखळा जातो. फलंदाजी करताना तो चौफेर फटकेबाजी करुन क्रिकेट चाहत्यांनं मनोरंजन करत असतो. तर मैदानाबाहेर असताना तो सोशल मीडियावर मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचे पुष्पा चित्रपटातील गाण्यांवर केलेले व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात. मात्र यावेळी तो रामाच्या भक्तित तल्लीन झाला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

david warner chants jai shree ram ahead of ipl 2024 video breaks the internet
IPL 2024 Complete Schedule: आजपासून क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात! इथे पाहा IPL स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

डेव्हिड वॉर्नरचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात तो आपल्या फॅन्ससोबत असल्याचं दिसून येत आहे. हे फॅन्स त्याच्या गळ्यात शाल घालताना दिसून येत आहेत. यासह त्या फॅन्सने वॉर्नरला राम मंदिराची प्रतिकृती असलेली मुर्ती देखील दिली आहे. मुख्य बाब म्हणजे डेव्हिड वॉर्नर व्हिडिओच्या शेवटी जय श्री रामचा नारा देताना दिसून येत आहे. वॉर्नरच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Cricket news in marathi)

दिल्लीकडून खेळणार..

डेव्हिड वॉर्नर हा आयपीएल २०२४ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसून येणार आहे. गेल्या हंगामातही तो याच संघात होता. गेल्या हंगामात रिषभ पंत दुखापतग्रस्त होता. त्यामुळे त्याच्या जागी डेव्हिड वॉर्नरला नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. मात्र दिल्ली कॅपिटल्सला या हंगामात चांगली कामगिरी करता आली नव्हती. आता रिषभ पंतचं कमबॅक झालं असून तो कमबॅक करताना दिसून येणार आहे. दरम्यान डेव्हिड वॉर्नर सलामी फलंदाज म्हणून खेळताना दिसेल.

david warner chants jai shree ram ahead of ipl 2024 video breaks the internet
IPL 2024, CSK vs RCB Playing 11: ओपनिंग सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग ११? खेळपट्टी कोणासाठी ठरणार लकी?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com