IPL 2024, CSK vs RCB Playing 11: ओपनिंग सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघाची प्लेइंग ११? खेळपट्टी कोणासाठी ठरणार लकी?

Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore, Playing 11 Details in Marathi: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज आणि फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आमने सामने येणार आहे.
CSK vs RCB Playing 11 IPL 2024 in marathi
CSK vs RCB Playing 11 IPL 2024 in marathi yandex
Published On

CSK vs RCB,Playing XI And Pitch Reports, IPL 2024:

क्रिकेटच्या कुंभमेळ्याला आजपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज आणि फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ आमने सामने येणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे.

गतवर्षी चेन्नईचा संघ चॅम्पियन ठरला होता. त्यामुळे यावर्षीही चेन्नईचा संघ आपलं जेतेपद राखण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या स्पर्धेतील ओपनिंगचा सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणार आहे. दरम्यान जाणून घ्या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११ आणि कशी असेल खेळपट्टी.

CSK vs RCB Playing 11 IPL 2024 in marathi
IPL 2024 Complete Schedule: आजपासून क्रिकेटच्या उत्सवाला सुरुवात! इथे पाहा IPL स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड (कर्णधार),रचिन रविंद्र, अजिंक्य रहाणे, मोइन अली, डॅरील मिशेल, शिवम दुबे, रविंद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकुर, दीपक चाहर, महेश थिक्षाणा.

अशी असू शकते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाची प्लेइंग ११:

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल,कॅमरुन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अल्जारी जोसेफ, मयंक डागर,आकाश दीप, मोहम्मद सिराज (Cricket news in marathi)

CSK vs RCB Playing 11 IPL 2024 in marathi
IPL Captains: हे आहेत आयपीएल स्पर्धेतील मराठमोळे कर्णधार

कशी असेल खेळपट्टी? (How Will Be The Pitch)

या मैदानावरील रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, या मैदानावर आतापर्यंत ७६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ४६ सामने जिंकले आहेत. म्हणजे ६० टक्के सामने हे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकले आहेत. सामने जसजसे पुढे जातात तसे आव्हानाचा पाठलाग करणं कठीण होतं. या मैदानावर १५०- १८० धावांचा पाठलाग करणं कठीण आहे.

कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

या दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. दोन्ही संघ आतापर्यंत ३१ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान चेन्नईने २० सामने जिंकले आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने १० सामने जिंकले आहेत. यादरम्यान १ सामना बरोबरीत राहिला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com