नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८मध्ये वेगवान खेळी खेळताना दिसत आहे. सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण मिळालेल्या भारतीय खेळाडूंनी तुफान सुरुवात केली. या डावात रोहित शर्माने अर्धशतकासह षटकारांचा विक्रम केला आहे. रोहित शर्माने अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक ठोकलं आहे.
भारतीय टीमच्या कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरोधात स्फोटक खेळी खेळली. सलामीवीर रोहितने सुरुवातीला ५ चेंडूत ६ धावा कुटल्या होत्या. त्यानंतर रोहित शर्माने आक्रमक खेळ सुरु केला. रोहितने तिसऱ्या षटकात ४ षटकार आणि १ चौकार लगावला. तिसऱ्या षटकात स्टार्कने २९ धावा दिल्या.
रोहित शर्माने १९ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. रोहित शर्माने आंतरराष्टीय क्रिकेटमधील सर्वात वेगान अर्धशतक ठोकलं. रोहित शर्माने पाचव्या षटकात अर्धशकत ठोकलं. रोहितने या टी-२० विश्वचषकातील वेगवान अर्धशतक ठोकलं. तर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना ९२ धावांवर बाद झाला. त्याचं ८ धावांनी शतक हुकलं. याच स्पर्धेत रोहितने वेस्टइंडिज विरोधात २२ चेंडूत अर्धशतक ठोकलंय. त्यावेळी रोहितने वेस्टइंडिजविरोधात ५२ धावा कुटल्या होत्या.
रोहित शर्मा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २०० षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या सामन्याआधी रोहितचा १९५ षटकारांचा विक्रम होता. त्यानंतर या सामन्यात मिचेल स्टार्कला ४ षटकार लगावले. तर पाचवा षटकार पॅट कमिन्सला लगावला. त्याने २०० वा षटकार १०० मीटर मारला. तर रोहितचा करिअरमधील १५७ वा सामना आहे.
रोहित शर्मा सर्वाधिक सामना खेळणारा खेळाडू ठरला आहे. रोहित शर्मानंतर सर्वाधिक षटकार लगावणारा १७३ षटकार लगावणारा मार्टिन गप्टील आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर बटलर आहे. त्याचा १३७ षटकार लगावण्याचा विक्रम आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.