IND vs AUS, Head To Head Record: टी-20 क्रिकेटमध्ये कोण वरचढ? कसा राहिलाय भारत- ऑस्ट्रेलियाचा हेड टू हेड रेकॉर्ड?

India vs Australia, Head To Head Record News In Marathi: आज होणाऱ्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड? जाणून घ्या.
IND vs AUS, Head To Head Record: टी-20 क्रिकेटमध्ये कोण वरचढ? कसा राहिलाय भारत- ऑस्ट्रेलियाचा हेड टू हेड रेकॉर्ड?
rohit sharma with mitchell marshgoogle

अखेर तो क्षण आला आहे. भारतीय संघ आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे. सुपर ८ फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करताना दिसून येणार आहे. सेंट लुसियातील डॅरिन सॅमी मैदानावर होणारा हा सामना सेमिफायनलच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात जिंकून भारतीय संघाला सेमिफायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. दरम्यान कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड? जाणून घ्या.

कोण कोणावर भारी?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-२० क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला, तर भारतीय संघाचं पारडं जड राहिल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही संघ २००७ पासून आमनेसामने येत आहेत. यादरम्यान दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ३१ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १९ सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाला केवळ ११ सामने जिंकता आले आहेत. तर सामना हा अनिर्णीत राहिला आहे.

IND vs AUS, Head To Head Record: टी-20 क्रिकेटमध्ये कोण वरचढ? कसा राहिलाय भारत- ऑस्ट्रेलियाचा हेड टू हेड रेकॉर्ड?
IND vs AUS, Weather Report: पाऊस खेळ बिघडवणार? सामना रद्द झाल्यास टीम इंडिया सेमिफायनल शर्यतीतून बाहेर पडणार?

वर्ल्डकपमध्ये कसा राहिलाय रेकॉर्ड?

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ५ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ऑस्ट्रेलियाला केवळ २ सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचं पारडं जड आहे. यासह न्यूट्रल वेन्यूवर खेळताना दोन्ही संघांचा रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघांमध्ये बरोबरीची लढत पाहायला मिळाली आहे. दोन्ही संघ ४ सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाला २ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला आहे. तर ऑस्ट्रेलियाने देखील २ सामन्यांमध्ये बाजी मारली आहे.

IND vs AUS, Head To Head Record: टी-20 क्रिकेटमध्ये कोण वरचढ? कसा राहिलाय भारत- ऑस्ट्रेलियाचा हेड टू हेड रेकॉर्ड?
IND vs AUS: संजू सॅमसनला संधी मिळणार? रोहित कोणाला बसवणार? AUSविरुद्धच्या सामन्यात अशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com