rohit sharma saam tv
Sports

Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीत धावांचा पाऊस पडणार की भारतीय गोलंदाज चमकणार? खेळपट्टी कोणाला देणार साथ?

Champions Trophy 2025, Pitch Report: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेदरम्यान कशी असेल खेळपट्टी? जाणून घ्या.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेची सुरुवात १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्याने होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरीदेखील भारतीय संघाचे सामने हायब्रिड मॉडेल असल्यामुळे दुबईत खेळवले जाणार आहेत.

दुबई म्हटलं की, स्लो खेळपट्टी. कधीतरीच हे खेळपट्टी वेगवान गोलंदाजांवर मेहरबान असते. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान ही खेळपट्टी कोणाला मदत करणार? जाणून घ्या.

कशी असेल खेळपट्टी?

भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळवले जाणार आहेत. दरम्यान माध्यमातील वृत्तानुसार, भारतीय संघाच्या सामन्यांसाठी फ्रेश खेळपट्टी तयार करण्यात आली आहे. भारतीय संघाचे सामने पाहता, २ फ्रेश खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. भारतीय संघ याच खेळपट्टीवर, बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा सामना करणार आहे.

भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. तर २३ फेब्रुवारीला पाकिस्तानविरुद्ध आणि २ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. जर भारतीय संघाने सेमीफायनल आणि फायनलमध्ये प्रवेश केला तर हे दोन्ही सामने देखील याच मैदानावर खेळवले जाणार आहेत.

गेल्या वर्षी दुबईत आयसीसी महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचा थरार पार पडला होता. त्यानंर पुरुषांचा अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचा थरार देखील याच मैदानावर पार पडला होता. त्यानंतर आयएल टी-२० लीग स्पर्धेचा थरार देखील याच मैदानावर रंगला होता. आयएल टी-२० लीग स्पर्धेदरम्यान याच मैदानावर १५ सामने खेळवले गेले होते. मात्र भारतीय २ खेळपट्ट्यांचा वापर केला गेला नव्हता.

कशी असेल खेळपट्टी?

एका सुत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले की, ' दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर १० खेळपट्ट्या आहेत. साखळी फेरीतील सामन्यांदरम्यान या १० पैकी २ खेळपट्ट्यांचा वापर केला जाणार नाही, हे आधीच ठरलं होतं.

या खेळपट्ट्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फ्रेश ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर प्लेऑफच्या सामन्यांसाठीही यापैकी कुठल्याही खेळपट्टीचा वापर केला गेला नव्हता. ही खेळपट्टी गोलंदाज आणि फलंदाजांसाठी फायदेशीर ठरु शकते.'

दुबईची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना चांगली उसळी मिळते. या स्पर्धेसाठी भारतीय संघात वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी, हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला दुखापतीमुळे संघात संधी देण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

SCROLL FOR NEXT