Champions Trophy 2025: भुर्रर्रर्र... टीम इंडिया दुबईला; रोहित शर्मा, विराट कोहलीसह कोण कोण? पहिला सामना कधी? VIDEO

Team India Left For Dubai ICC Champions Trophy : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया दुबईला रवाना झाली. भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळणार आहे. मुंबई विमानतळावर विराट कोहली, रोहित शर्मा, गौतम गंभीर यांच्यासह सर्व खेळाडू आणि स्टाफ होता.
टीम इंडिया गेली दुबईला, रोहित शर्मा, विराट कोहलीसह कोण कोण? पहिला सामना कधी? VIDEO
Team india, Virat Kohli and Rohit Sharmasaam tv
Published On

भारतीय क्रिकेट संघानं मायदेशात इंग्लंडला टी २० मालिकेत धूळ चारली. त्यानंतर वनडे मालिकेतही दारूण पराभव केला. आता टीम इंडियाचं पुढचं लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफी असणार आहे. पाकिस्तानकडे स्पर्धेचे यजमानपद असलं तरी भारताचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. इंग्लंडविरुद्धचा तिसरा आणि अखेरचा वनडे सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबईला पोहोचली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचे खेळाडू, कोच आणि स्टाफ निघाला आहे. मुंबई विमानतळावरून विमानानं दुबईच्या दिशेने उड्डाण भरले.

एएनआयने टीम इंडियाच्या खेळाडूंचा एक व्हिडिओ एक्स हँडलवर पोस्ट केला आहे. त्यात भारतीय खेळाडूंसह मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल दिसत आहेत. मुंबई विमानतळावर विराट कोहली, मोहम्मद शमी, शुभमन गिल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अक्षर पटेल, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर, केएल राहुल, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, असिस्टंट कोच रेयानटेन डेशकाटे हे होते.

टीम इंडिया गेली दुबईला, रोहित शर्मा, विराट कोहलीसह कोण कोण? पहिला सामना कधी? VIDEO
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारत, ऑस्ट्रेलियानंतर आता न्यूझीलंड संघालाही तगडा झटका

टीम इंडियाचे नवे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक हे देखील मुंबई विमानतळावर टीमसोबत दिसले. तर एका अन्य व्हिडिओमध्ये रोहित शर्मा हा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांच्यासोबत होता. टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पंड्या हा देखील संघासोबत होता. टीम इंडियाचा पहिला जत्था आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दुबईला रवाना झाला आहे.

बीसीसीआयच्या त्या नियमाचा इम्पॅक्ट

संघाचे सर्व खेळाडू एकत्रच निघतील, असा एक नियम बीसीसीआयनं केला होता. त्याचा परिणाम यावेळी दिसून आला. या व्हिडिओच्या माध्यमातून ते प्रकर्षाने जाणवले. बॉर्डर गावसकर ट्रॉफीनंतर बीसीसीआयने रिव्ह्यू मिटिंग घेताना अनेक नियम टीम इंडियासाठी घालून दिले होते. संघातील सर्व खेळाडू हे एकत्रच पुढील लढतींसाठी किंवा दौऱ्यासाठी निघतील, असं सांगण्यात आलं होतं. बीसीसीआयच्या या कठोर पावलानंतर सर्व खेळाडू त्याचं पालन करत असल्याचे दिसून आलं.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचं वेळापत्रक

टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप स्टेजमध्ये तीन सामने खेळेल. ग्रुप एमध्ये भारतासोबत बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड हे संघ आहेत. भारताचा पहिला सामना हा २० फेब्रुवारीला बांगलादेश, २३ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि तिसरा सामना २ मार्चला न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.

टीम इंडिया गेली दुबईला, रोहित शर्मा, विराट कोहलीसह कोण कोण? पहिला सामना कधी? VIDEO
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, फॅन्सनाही मिळणार मोठा झटका!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com