Champions Trophy 2025: ‘ रोहित चमकणार, पण टीम इंडिया...’ चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

Michael Clark On Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेआधी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मायकल क्लार्कने मोठी भविष्यवाणी केली आहे.
Champions Trophy 2025: ‘ रोहित चमकणार, पण टीम इंडिया...’ चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
rohit sharmatwitter
Published On

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही महिन्यांपासून पूर्णपणे फ्लॉप ठरत होता. त्यामुळे भारतीय संघाचं टेन्शन वाढलं होतं. अखेर इंग्लंडविरुद्ध झालेल्या कटक वनडे सामन्यात त्याने दमदार कमबॅक केलं आणि शानदार शतकी खेळी केली. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीआधी भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे.

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्मा, शुभमन गिलसोबत डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात येईल. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कने मोठी भविष्यवाणी केली आहे.

मायकल क्लार्कच्या मते, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रोहित शर्मा धावांचा पाऊस पाडून विरोधी संघासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.

Champions Trophy 2025: ‘ रोहित चमकणार, पण टीम इंडिया...’ चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Champions Trophy 2025: भुर्रर्रर्र... टीम इंडिया दुबईला; रोहित शर्मा, विराट कोहलीसह कोण कोण? पहिला सामना कधी? VIDEO

काय म्हणाला क्लार्क?

मायकल क्लार्क म्हणाला, ‘माझ्या मते, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या नावावर करेल. रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला आहे. तो देखील धावांचा पाऊस पाडेल. रोहितला धावा करताना पाहून बरं वाटतंय. भारतीय संघाला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत.’ यासह त्याने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचही कौतुक केलं.

Champions Trophy 2025: ‘ रोहित चमकणार, पण टीम इंडिया...’ चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Team India: IND vs ENG मालिकेतून टीम इंडियाला काय मिळालं? Champions Trophy आधी किती प्रश्नांची उत्तरं मिळाली?

जोफ्रा आर्चरबद्दल बोलताना काय म्हणाला?

मायकल क्लार्क म्हणाला, ‘ माझ्या मते, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर हा या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरू शकतो. मला जोस बटलरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडकडून फार काही अपेक्षा नाहीत. मी इंग्लंड संघाला चांगलाच पारखून आहे. मला माहित आहे , हा संघ फार काही करू शकणार नाही. पण जोफ्रा आर्चर सुपरस्टार आहे.’

Champions Trophy 2025: ‘ रोहित चमकणार, पण टीम इंडिया...’ चॅम्पियन्स ट्रॉफीआधी दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, फॅन्सनाही मिळणार मोठा झटका!

चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक...

19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची

20 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई

21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची

22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर

23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई

24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी

25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी

26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर

17 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी

28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर

1 मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची

2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई

4 मार्च- उपांत्य फेरी-1, दुबई

5 मार्च- उपांत्य फेरी-2, लाहोर

9 मार्च - फायनल, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळला जाईल)

10 मार्च - राखीव दिवस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com