
भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील तिन्ही सामन्यात विजय मिळवत भारताने ही मालिका ३–० ने आपल्या नावावर केली. अहमदाबादच्या मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या वनडेत भारतीय संघाने १४२ धावांनी विजय मिळवला. दरम्यान या विजयानंतर काय म्हणाला भारताचा कर्णधार रोहित शर्मा? जाणून घ्या.
येत्या १९ फेब्रुवारीपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ तयार आहे. याबाबत बोलताना रोहित म्हणाला, ’ संघात प्रत्येकाला मनमोकळेपणाने खेळण्याचं स्वातंत्र्य आहे. वर्ल्डकप २०२३ स्पर्धा याचं आदर्श उदाहरण आहे. आम्हाला हेच पुढेही सुरू ठेवायचं आहे. कधी कधी अशी ही वेळ येऊ शकते, जेव्हा सर्वकाही ठीक नसेल, तेही चालेल.‘
तसेच तो पुढे म्हणाला की, ‘ ज्या पद्धतीने ही मालिका पुढे गेली आहे, ते पाहून मला प्रचंड आनंद झालाय. आमच्यासमोर आव्हानं असतील हे आम्हाला माहीत होतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावर आम्ही काम करतोय. मी इथे उभं राहून ते समजावणार नाही. संघात सातत्य टिकवून ठेवणं हे आमचं काम आहे.’
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या भारतीय संघाने ५० षटकअखेर ३५६ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून शुभमन गिलने सर्वाधिक ११२ धावांची खेळी केली. तर श्रेयस अय्यरने ४२ धावांची खेळी केली.
विराट कोहलीने या डावात ५२ आणि केएल राहुलने ४० धावा करत संघाची धावसंख्या ३५६ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा डाव २१४ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना १४२ धावांनी आपल्या नावावर केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.