AFGHANISTAN twitter
क्रीडा

भारतानंतर श्रीलंकेला दणका देत अफगाणिस्तानने रचला इतिहास! पहिल्यांदाच उंचावली Emerging Asia Cup ची ट्रॉफी

Afghanistan vs Srilanka, Emerging Asia Cup Final: अफगाणिस्तानने एमर्जिंग एशिया कपची ट्रॉफी उंचावली आहे.

Ankush Dhavre

Afghanistan Won Emerging Asia Cup Title: अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे. आधी भारतीय संघाला स्पर्धेतून बाहेर केलं. आता थेट स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. एमर्जिंग एशिया कप स्पर्धेतील फायनलचा सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानने ७ गडी राखून विजय मिळवला. यासह पहिल्यांदाच या स्पर्धेची ट्रॉफी उंचावली आहे.

अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १३४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानने १८.१ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं. अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना सेदीकुल्लाहने ५५ चेंडूंचा सामना करत ५५ धावांची शानदार खेळी केली. या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि १ षटकार खेचला. यासह करीम जनतने ३३ धावांची खेळी केली. तर रसूलीने २० चेंडूत २४ धावांची खेळी केली.

शेवटी फलंदाजी करताना मोहम्मद ईशाकने ६ चेंडूंचा सामना करत १६ धावांची शानदार खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला चांगली सुरुवात करता आली नव्हती. सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. मात्र त्यानंतर फलंदाजांनी कमबॅक केलं आणि सामना जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली.

श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना इशान मलिंगा, दुशान हेमंथा आणि सहान आरासिंघेने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. तर श्रॉलंकेच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, श्रीलंकेला २० षटक अखेर ७ गडी बाद १३३ धावा करता आल्या. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना सहान आरासिंघेने तुफान फटकेबाजी करत ६४ धावांची शानदार खेळी केली. तर विमुखीने २३ धावांचे योगदान दिले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : शरद पवार आणि अजित पवार दोघेही आमचेच - अण्णा बनसोडे

Success Story: नोकरी करत UPSC ची तयारी, ५ वेळा फेल पण हर मानली नाही, IAS झालीच; राम्या यांच्या यशाची कहाणी वाचाच!

Vaidehi Parashurami : दिवाळीनिमित्त वैदेहीने दिल्या चाहत्यांना खास शुभेच्छा

दिवाळीपूर्वी तुमच्या किचनमधून बाहेर काढा 'या' गोष्टी, आर्थिक संकट येणार नाही

'टायपिंग मिस्टेक'च्या विधानावर पटोलेंचा राऊतांवर पलटवार; बघा पटोलेंनी काय सल्ला दिला

SCROLL FOR NEXT