India vs New Zealand 2nd Test: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने भारतीय संघाला पूर्णपणे बॅकफूटवर ढकललं आहे.
पहिल्या डावात भारतीय संघजा डाव कोसळल्यानंतर दुसऱ्या डावातही भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे. भारतीय संघासमोर हा सामना जिंकण्यासाठी ३५९ धावांची गरज आहे. मात्र सँटनर पुन्हा एकदा नडला आहे.
पुण्याची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरत आहे. न्यूझीलंडचा फिरकीपटू मिचेल सँटनरला या खेळपट्टीवरील अचूक टप्पा सापडलाय. पहिल्या डावापासूनच तो भारतीय संघासाठी डोकेदूखी ठरतोय. पहिल्या डावात गोलंदाजी करताना त्याने न्यूझीलंडच्या ७ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. आता दुसऱ्या डावातही तो भारतीय फलंदाजांना नडतोय.
भारतीय संघाकडून या धावांचा पाठलाग करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी मैदानात आली होती. दोघांनी संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र सँटनर इथेही नडला. सँटनरने रोहितला ८ धावांवर माघारी धाडलं. रोहित बाद झाल्यानंतर जयस्वाल आणि गिलने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा एकदा सँटनर नडला. त्याने गिलला २३ धावांवर माघारी धाडलं.
संघातील टॉप ऑर्डरचे फलंदाज माघारी परतल्यानंतर सर्व जबाबदारी विराट कोहलीवर होती. विराटला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र सँटनरने त्याला पायचित करत माघारी धाडलं. रिषभ पंत शून्यावर धावबाद होऊन माघारी परतला. तर सरफराज खान हा सँटनरचा पाचवा बळी ठरला. एकट्या सँटनरने भारताचा अर्धा संघ तंबूत पाठवला आहे. सँटनरने पहिल्या डावातही गोलंदाजी करताना ७ गडी बाद केले होते. या शानदार गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाचा डाव अवघ्या १५६ धावांवर आटोपला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.