GT VS RR IPL 2025 x
Sports

GT VS RR : गुजरातचा विजयरथ रोखून हॅटट्रीक करणार का राजस्थान? पाहा कोणाचं पारडं जड..

GT VS RR IPL 2025 : गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. घरच्या स्टेडियमवर गुजरातचा विजय होणार की राजस्थान विजयाची हॅटट्रीक करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Yash Shirke

GT VS RR News अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२५ मधला २३ वा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यामध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स हे संघ आमने-सामने येणार आहेत. घरच्या मैदानात खेळत असल्याने गुजरातचे पारडे काही प्रमाणात जड असल्याचे म्हटले जात आहे. पण गुजरात प्रमाणे राजस्थान देखील फॉर्ममध्ये असल्याने आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

आयपीएल २०२५ मध्ये गुजरातच्या संघाने एकूण ४ सामने खेळले आहेत. पहिल्या समान्यात पंजाबने गुजरातचा पराभव केला होता. पण दमदार कमबॅक करत गुजरात टायटन्सने पुढील तिन्ही सामने जिंकले आहेत. कर्णधार शुबमन गिल, साई सुदर्शन, जॉस बटलर यांचा चांगला फॉर्म सुरु आहे. मागच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरच्या रुपाने गुजरातला चांगला फलंदाज मिळाला आहे. मोहम्मद सिराजसह गुजरातचे गोलंदाज देखील चांगली कामगिरी करत आहेत.

दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्सने देखील ४ सामने खेळले आहेत. सुरुवातीच्या दोन सामन्यामध्ये राजस्थानला पराभवाला सामोरे जावे लागले. पण त्यांनी पुढचे दोन्ही सामने जिंकले. विजयाची हॅटट्रीक करण्यासाठी राजस्थान सज्ज आहे. यशस्वी जयस्वाल पुन्हा फॉर्ममध्ये आला आहे. रियान पराग, ध्रुव जुरेल देखील आक्रमक खेळी करत आहेत. याशिवाय राजस्थानच्या गोलंदाजी विभागामध्ये देखील सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेड-टू-हेड रेकॉर्ड

गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ही लढत आयपीएलमध्ये सहा वेळा पाहायला मिळाली आहे. ६ सामन्यांपैकी ५ सामन्यांमध्ये गुजरात टायटन्सचा विजय झाला आहे. तर एक सामना राजस्थान रॉयल्सने जिंकला आहे. त्यामुळे एकूण परिस्थिती पाहता आजचा सामना गुजरातचा विजय होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेईंग 11 -

साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, शेरफन रुदरफोर्ड, राहुल तेवतिया, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा.

राजस्थान रॉयल्सची संभाव्य प्लेईंग 11 -

यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, वानिंदु हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

SCROLL FOR NEXT