PM Kisan Yojana: शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या ₹२००० खटाखट जमा होणार; तुम्हाला मिळणार की नाही? वाचा सविस्तर

PM Kisan Yojana 22nd Installment Come Tommorrow: पीएम किसान योजनेचा हप्ता उद्या जमा केला जाणार आहेत. पात्र शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहे. तुम्हाला पैसे मिळणार की नाही हे चेक करा.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On
Summary

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची माहिती

उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार २००० रुपये

तुम्हाला मिळणार की नाही?

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खुशखबर आहे. पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना २००० रुपये मिळणार आहेत. पीएम किसानच्या २२व्या हप्त्याची तारीख जाहीर केली आहे. आता शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या पैसे जमा केले जाणार आहे. देशातील जवळपास ९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान, तुम्हाला पैसे येणार की नाही हे तुम्ही चेक करु शकतात.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी ही ४ कामे आताच करा, अन्यथा ₹२००० विसरा

पीएम किसानचा हप्ता उद्या जमा होणार आहे. पीएम नरेंद्र मोदी उद्या गुवाहाटी येथून हप्ता जारी करणार आहे. संध्याकाळी ५ वाजता हा कार्यक्रम सुरु होईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा केले जाणार आहेत.पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न केल्यास पैसे मिळणार नाही.

पीएम किसानचा हप्ता तुम्हाला मिळणार का? (PM Kisan Yojana Installment Recieve or Not)

पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर याबाबत माहिती येईल. जर तुमच्या खात्यात पैसे जमा झाले तर तुम्हाला हप्ता मिळाला आहे. ज्यांना मेसेज आला नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत.

स्टेटस कसा चेक करायचा?

तुम्हाला सर्वात आधी https://pmkisan.gov.in/ वर जायचे आहे.

यानंतर Know Your Status वर क्लिक करा.

यानंतर तुम्हाला काही माहिती विचारली जाईल. रजिस्ट्रेशन नंबर टाका.

यानंतर कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.

यानंतर तुम्हाला तुमचा स्टेट्‍स दिसणार आहे. यावरुन पैसे येणार की नाही समजणार आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसानचा हप्ता; २ दिवसात खात्यात जमा होणार ₹२०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com