

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी
१३ मार्चला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात ₹२०००
पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना लवकरच हप्ता मिळू शकतो. पीएम किसानचा २२वा हप्ता लांबणीवर गेला आहे. त्यानंतर आता पीएम किसानचा हप्ता कधी येणार याची तारीख समोर आली आहे. शेतकऱ्यांना १३ मार्चला खात्यात २००० रुपये येऊ शकतात. जवळपास ९ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येऊ शकतात.
पीएम किसान योजनेचा वर्षभराचा निधी ६००० रुपये आहे. प्रत्येक हप्त्यात २००० रुपये दिले जातात. आतापर्यंत २१ हप्ते दिले गेले आहेत. आता पुढच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पीएम किसानचा २२वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येण्याची अपेक्षा होती. मात्र, फेब्रुवारी महिना उलटून गेला आहे तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.
पीएम किसानचा हप्ता या तारखेला येणार (PM Kisan Yojana 22nd Installment May Come on these Date)
पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता १३ मार्च २०२६ रोजी येऊ शकतात. १३ मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममधील कोकराझार दौऱ्यावर आहेत. येथे एक कार्यक्रम आयोजित आहेत. याच कार्यक्रमात पीएम किसान योजनेबाबत घोषणा होऊ शकते. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
तुम्हाला पैसे मिळणार की नाही? (PM Kisan Yojana Status Check)
पीएम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही हे तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने समजणार आहे. तुम्ही स्टेट्स चेक करु शकतात.
सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.
वेबसाइटवर Know Your Status वर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. जर रजिस्ट्रेशन नंबर माहित नसेल तर Know Your Registration Number यावर क्लिक करा.
यानंतर नंबर टाकून कॅप्चा कोड टाका.
यानंतर तुम्हाला योजनेचा स्टेट्स दिसणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.