

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार
होळीनंतर खात्यात येऊ शकतात पैसे
शेतकऱ्यांना ₹२००० प्रतिक्षा
पीएम किसान योजनेचा ९ कोटी शेतकरी लाभ घेत आहेत. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. त्यानंतर शेतकरी २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, अजूनही शेतकऱ्यांना पैसे आले नाहीत त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात येणे अपेक्षित होते. मात्र, फेब्रुवारी महिना संपला आहे तरीही पैसे न आल्याने खूप प्रश्न निर्माण झाले आहेत. दरम्यान, होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं बोललं जात होतं.
उद्या म्हणजेच २ मार्च रोजी होळी आहे. त्याआधी पैसे जमा होण्याची शक्यता खूप कमी आहे. जर होळीला पैसे येणार असते तर घोषणा केली असती. मात्र, अजूनही पीएम किसानच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे खूप प्रश्न पडले आहेत.
पीएम किसान योजनेत आता होळीनंतरच २००० रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. दरम्यान, हप्ता जमा करण्याआधी अधिकृतपणे घोषणा केली जाईल. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या नजरा सरकारच्या घोषणेकडे लागल्या आहेत.
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार पैसे
पीएम किसान योजनेचे काही निकष आहेत. या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळतो. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. याचसोबत योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी न केलेल्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीयेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसानचा लाभ घेण्यासाठी आधी केवायसी करावी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.