

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट
कधीही येऊ शकतात ₹२०००
त्याआधी केवायसी करणे अनिवार्य
पीएम किसान योजनेत केवायसी करण्याची ऑनलाइन प्रोसेस
केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे दिले जातात. प्रत्येक २००० रुपये हप्त्यात दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हप्ते जमा झाले आहेत. त्यानंतर शेतकरी २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. फेब्रुवारी महिन्यात २२वा हप्ता येणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, हप्ता मिळवण्याआधी तुम्हाला हे काम करायचे आहे अन्यथा पैसे मिळणार नाही.
पीएम किसानच्या लाभासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न केल्यास शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार नाहीत. त्यामुळे तुम्ही आधी केवायसी करुन घ्या.
कधीही खात्यात जमा होतील ₹२०००
पीएम किसान योजनेचा हप्ता फेब्रुवारीत जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. फेब्रुवारी महिना संपायला आता १५ दिवस उरले आहेत. त्यामुळे कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात ₹२००० जमा केले जाऊ शकतात. त्याआधी तुम्ही केवायसी करायची आहे. यासाठी ऑनलाइन प्रोसेस फॉलो करा.
वेबसाइटनुसार, पीएम किसानच्या सर्व रजिस्टर लाभार्थ्यांना ईकेवायसी करायची आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि रजिस्टर मोबाईल नंबरची गरज भासणार आहे. याचसोबत तुम्ही जवळच्या CSC सेंटरवर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने ईकेवायसी करु शकतात. जर तुम्ही ईकेवायसी केले नाही तर तुम्हाला २००० रुपये मिळणार नाही.
केवायसी करण्याची ऑनलाइन प्रोसेस (PM Kisan Yojana eKYC Online Process)
सर्वात आधी तुम्हाला पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जायचे आहे.
यानंतर तुम्हाला फार्मर्स कॉर्नर या सेक्शनवर क्लिक करायचे आहे.
यानंतर ईकेवायसी या ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर तुमच्या आधारशी लिंक मोबाईल नंबर टाकायचा आहे.
यानंतर तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे.
ओटीपी टाकल्यानंतर ईकेवायसी पूर्ण होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.