PM Kisan Yojana: पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? ₹२००० बाबत मोठी अपडेट

PM Kisan Yojana 22nd Installment Date: पीएम किसान योजनेचा हप्ता कधी येणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे. पीएम किसानचा योजना लवकरच देण्यात येईल, असं सांगितलं जात आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On
Summary

पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार?

२००० रुपयांबाबत मोठी अपडेट

या दिवशी पैसे येण्याची शक्यता

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हप्ते जमा करण्यात आले आहे. पुढचा हप्ता फेब्रुवारीमध्ये जमा करणार असल्याचे बोलले जात होते. आता पैसे कधी येणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पती-पत्नी दोघांनाही पीएम किसानचे ₹२००० मिळतात का? वाचा नियम काय सांगतो

देशाच्या अर्थसंकल्पानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं सांगितलं होतं. दरम्यान, अजूनही काहीही घोषणा झालेली नाही. याचसोबत आता पुढच्या महिन्यात होळी आहे. त्यामुळे त्यादरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. या कालावधीत कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाऊ शकतात.

पीएम किसान योजना ही कृषी विभागाअंतर्गत येते. कृषी विभागाद्वारे हे पैसे ट्रान्सफर केले जातात. यासाठी सर्व डेटा तयार केला जातो. त्यानंतर पैसे ट्रान्सफर केले जातात. याबाबत कृषी विभाग सोशल मिडिया आणि पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर माहिती देतात.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएम किसानचा २२वा हप्ता जमा करण्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातील. दरम्यान, २१वा हप्ता जमा होण्यास उशिर झाला होतो. काही तांत्रिक अडचणींमुळे पैसे जमा होण्यास उशिर झाला होता. परंतु यावेळी उशिर होणार नसल्याचे समोर आले आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अर्थसंकल्पानंतर खात्यात जमा होणार ₹२०००, समोर आली मोठी अपडेट

पीएम किसान योजनेचा हप्ता २४ फेब्रुवारीच्या आसपास येऊ शकतो. याचसोबत काही मिडिया रिपोर्टनुसार, होळीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com