EPFO Rule
EPFO RuleSaam Tv

EPFO Update: खुशखबर! PF चे पैसे UPI मधून काढता येणार; कधीपासून सुरु होणार? वाचा सविस्तर

EPFO PF Withdrawal Through UPI and ATM: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता ईपीएफओचे पैसे तुम्ही एटीएम किंवा यूपीआयद्वारे काढू शकणार आहात. यासाठी नवीन अॅप लाँच केले जाणार आहे.
Published on
Summary

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आता पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार

ईपीएफओ करणार नवीन अॅप लाँच

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ईपीएफओ कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे. ८ कोटी सदस्यांना दिलासा देणारी बातमी आहे. आता तुम्हाला पीएफचे पैसे काढण्यासाठी सरकारी ऑफिसच्या फेऱ्या घालाव्या लागणार नाही. आता तुम्ही फक्त काही क्लिकवर पीएफचे पैसे काढू शकतात. ईपीएफओ लवकरच नवीन अॅप सुरु करणार आहे.

 EPFO Rule
EPFO 3.0: ईपीएफओमध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करायचा? ऑनलाइन अन् ऑफलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

ईपीएफओ पीएफसंबंधित सर्व कामांसाठी नवीन अॅप सुरु करणार आहे. या अॅपच्या माध्यमातून तुम्ही यूपीआय किंवा एटीएममधून पैसे काढू शकणार आहात. हे पैसे थेट तुमच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

किती पैसे काढता येणार? (How Much PF Withdrawal Through UPI)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओद्वारे ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी एक रक्कम निश्चित केली जाईल. हे पैसे तुम्हाला लगेच काढता येणार आहेत.हे पैसे तुम्ही यूपीआयद्वारे काढू शकतात.याची प्रोसेस खूप सिंपल असणार आहे.

एप्रिलपासून सुरु होणार प्रोसेस (EPFO 3.0 Update Starting From April)

सध्या ईपीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी उमंग अॅप किंवा पोर्टलवर जावे लागते. त्यानंतर क्लेम करावा लागतो. परंतु या प्रोसेससाठी अनेक दिवसांचा कालावधी लागतो. ऑटो सेटलमेंटमध्ये ३ तीन दिवस लागतात परंतु तरीही वेळ लागतो. परंतु या नवीन अॅपमुळे ही प्रोसेस खूप सोपी होणार आहे. यामधून किती आणि पैसे काढायची प्रोसेस कशी असणार हे अॅप लाँच झाल्यावरच समजणार आहे.

 EPFO Rule
EPFO: तुमची कंपनी PF खात्यात खरंच पैसे जमा करते का? EPFO ने घेतला मोठा निर्णय; कर्मचाऱ्यांचे टेन्शन दूर होणार

डमी अकाउंट्सवर ट्रायल सुरु

ईपीएफओच्या अॅपसाठी १०० डमी अकाउंट्सवर ट्रायल सुरु आहे. ट्रायल झाल्यानंतर एप्रिल महिन्यात अॅप लाँच केले जाणार आहे. त्यामुळे ८ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. दरवर्षी ५ कोटींपेक्षा जास्त कर्मचारी पीएफ क्लेम करतात.

 EPFO Rule
EPFO कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाय; नव्या अ‍ॅपद्वारे निघेल पीएफचा पैसा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com