अभिजीत सोनवणे, साम टीव्ही
नाशिक: नग्नावस्थेत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतरासाठी दबाव आणल्याचा आरोप करत धर्मांतरास नकार दिल्यास पंधरा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणात संशयित अब्दुल जलालउद्दीन शेख व त्याची गुरू संशयित सलमा यांच्याविरुद्ध पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचवटीतील गजानन चौक परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय युवकाची २०२० मध्ये एका तरूणाच्या माध्यमातून किन्नरसारखा वेश परिधान केलेल्या पार्वतीशी ओळख झाली.
संबंधित व्यक्ती कालिकानगरमध्ये राहत असून घरी देवीचा दरबार भरवत ओळखीच्या माध्यमातून युवकाचे पार्वतीच्या घरी येणे-जाणे सुरू झाले. संशयिताने युवकाचे अश्लिल फोटो मोबाईलमध्ये काढून घेतले. काही दिवसांनी तक्रारदारास संशयित पार्वती नसून, अब्दुल जलालउद्दीन शेख असल्याचे समजले. त्यामुळे संपर्क कमी केल्यानंतर संशयिताने आत्महत्येची धमकी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून संशयिताने मोबाइलमधील अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत १५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तसेच पैसे न दिल्यास धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकला आणि नकार दिल्यास युवक व त्याच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
या घटनेतील फिर्यादी पीडित युवकाची एका मयूर नावाच्या व्यक्तीशी मित्राच्या माध्यामातून संशयित आरोपी अब्दुल आणि गुरु सलमासोबत ओळख झाली होती. दोघा संशयितांनी त्यांच्या मोबाइलमध्ये काढलेले त्या युवकाचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत धर्मांतर करण्यासाठी टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.