

शिवनेरी किल्ल्यावर उडी मारत एमपीएससीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
सनसेट पॉईंट परिसरात दरीत मृतदेह आढळून आला
वनविभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या पथकाने रेस्क्यू मोहीम राबवली
आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट
पोलिस सध्या तपास करत आहेत
शिवनेरी किल्ल्यावरील सनसेट पाईंटवरून उडी मारत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा तरुण एमपीएससीचा विद्यार्थी होता. या तरुणाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा तरुण शिवनेरी किल्ल्यावर फिरण्यासाठी आला होता. त्याचवेळी सनसेट पाईंटवर जाऊन त्याने ७०० फूट खोल दरीत उडी मारली.
जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले शिवनेरी गडावर फिरायला आलेल्या एका तरुणाचा मृतदेह अंबरखानाच्या पाठीमागील खोल दरीत आढळून आला. किल्ले शिवनेरी गडाच्या सनसेट पॉईंटजवळील कड्यावरून सुमारे ७०० फूट खोल दरीत हा मृतदेह आढळला आला. मृत तरुणाची ओळख शिरूर येथील रहिवासी मंगेश सोनवणे अशी झाली आहे. मंगेश हा एमपीएससी परीक्षेची तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.
मंगेश सोनवणे या तरुणाने आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर जुन्नर वनविभाग आणि पुरातत्त्व विभागाच्या संयुक्त पथकाने रेस्क्यू मोहिम राबवून मंगेशचा मृतदेह बाहेर काढला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जुन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. मंगेशने आत्महत्या का केली यामागचे कारण अद्याप समोर आले नाही. जुन्नर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
दरम्यान, लोणावळ्यात देखील सनसेट पाईंट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दरीत पडून मृत्यू झाला. खंडाळा टेकडीवर सनसेट पाईंट पाहत असताना त्याचा पाय घसरला आणि तो ८० ते ८० फूट खोल दरीत कोसळला. डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्रज्वल गिरी (२६ वर्षे) असं या तरुणाचे नाव असून तो पुण्यात राहत होता. प्रज्वल एमपीएससी तसंच नेट-सेट परीक्षेची तयारी करत होता. मित्रांसोबत तो लोणावळ्यात फिरायला गेला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.