EPFO कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाय; नव्या अॅपद्वारे निघेल पीएफचा पैसा
ईपीएफओकडून एप्रिलमध्ये नवीन मोबाइल अॅप लॉन्च केले जाणार आहे
यूपीआयद्वारे तात्काळ पीएफ रक्कम काढण्याची सुविधा मिळणार आहे.
२५ टक्के पीएफ रक्कम ठेवण्याचा नवीन नियम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) त्यांच्या लाखो सदस्यांसाठी खास सुविधा सुरू करणार आहे. यामुळे पीएफओ सदस्यांचं एक चिंता मिटणार आहे. EPFO ऑनलाइन सेवांना हायटेक बनवत आहे, त्यात UPI पेमेंट गेटवेद्वारेच सदस्यांना पीएफचा पैसा काढता येणार आहे. यासाठी विभाग या वर्षी एप्रिलमध्ये एक नवीन मोबाइल अॅप लाँन्च करणार आहे. या नवीन वैशिष्ट्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांचे पीएफ निधी त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित होण्यासाठी जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.
"EPFO 3.0" नावाच्या EPFO सुधारणांच्या तिसऱ्या टप्प्यासह ही सेवा पूर्णपणे सक्रिय होईल. कामगार मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नवीन मोबाइल अॅप आणि UPI या प्रणालीच्या चाचण्या आधीच सुरू झाल्या आहेत. सध्या एप्रिलमध्ये लाँन्च झाल्यावर कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी १०० हून अधिक डमी खात्यांसह या तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जातेय. हे पाऊल डिजिटल इंडियाच्या दिशेकडे जाणार मोठं पाऊल समजलं जाणार आहे.
पैसे काढण्याची मर्यादा आणि नवीन नियम
UPI पैसे काढल्यानंतरही काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नवीन कामगार संहितेनुसार, एकूण EPF खात्यातील शिल्लक रकमेपैकी किमान २५ टक्के रक्कम गोठवली जाईल. खातेधारकांना त्यांच्या उर्वरित रकमेतून गरजेनुसारच पैसे काढता येतील. नवीन मोबाइल अॅप केवळ पैसे काढण्याची परवानगी देणार नाही तर त्यांना त्यांचे पासबुक बॅलन्स तपासण्याची आणि इतर आवश्यक सेवांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देणार.
नवीन मोबाईल अॅप लाँच झाल्यानंतरही सध्याच्या UAN नंबर आणि उमंग पोर्टल सेवा चालू राहतील. सध्या पीएफ काढण्याच्या प्रक्रियेला बराच वेळ लागतो, परंतु ऑटो-सेटलमेंट मोडमध्ये अर्ज केल्यानंतर तीन दिवसांच्या आत सेटलमेंट पूर्ण होत असते. नुकतेच ईपीएफओने ऑटो-सेटलमेंट मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

