PM Kisan Yojana: झेडपी निवडणुकीआधी शेतकऱ्यांना मिळणार ₹४०००; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

PM Kisan and Namo Shetkari Installment Come Together Before ZP Election: शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात डबल गिफ्ट मिळणार आहे. पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता एकाच महिन्यात येणार आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On
Summary

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

फेब्रुवारी महिन्यात मिळणार ₹४०००

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता पुढच्या महिन्यात येणार

शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाती बातमी आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पुढच्या महिन्यात ४००० रुपये जमा होणार आहेत. पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत हे पैसे मिळणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना पुढच्या महिन्यात डबल गिफ्ट मिळणार आहे. त्यांच्या खात्यात दोन्ही योजनेचे पैसे जमा होणार आहेत. पुढच्या महिन्यात जिल्हा परिषद निवडणुकीआधी शेतकऱ्यांना पैसे मिळतील.

PM Kisan Yojana
Namo Shetkari Yojana: ‘नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता; राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात

पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांना ४००० रुपये मिळणार (Farmers Will Get 4000 Rupees In Next Month)

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. प्रत्येकी २००० रुपये असे तीन हप्ते दिले जातात. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही नमो शेतकरी योजना सुरु केली आहे. या योजनेतही शेतकऱ्यांना २००० रुपये दिले जातात. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातात.

दरम्यान, आता फेब्रुवारी महिन्यात पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पीएम किसानचा याआधीचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात दिला होता. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पुढचा २२ वा हप्ता येऊ शकतो.

जिल्हा परिषदेआधी येणार पैसे (Farmer Will Get Money Before Zilla Parishad Election)

राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेतदेखील पुढच्या महिन्यात पैसे देण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली गेली आहे. कृषी विभागाने वित्त विभागाकडे १ हजार ९३० कोटींचा निधी मागितला आहे. हा निधी मंजुरी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. जिल्हा परिषदेआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. ५ फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्याआधी शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता येऊ शकतो.

PM Kisan Yojana
DDA Housing Scheme : राजधानीत फक्त १० लाखांत आलिशान घर, DDA ची हाऊसिंग स्कीम लॉन्च, वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com