PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० हवेत? आजच करा eKYC; स्टेप बाय स्टेप करा फॉलो

PM Kisan Yojana eKYC Process: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधीही जमा केला जाऊ शकतो. दरम्यान, यासाठी ईकेवायसी करणे गरजेचे आहे. तुम्ही ऑनलाइन पद्धतीने ईकेवायसी करु शकतात.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam tv
Published On
Summary

पीएम किसान योजनेसाठी केवायसी अनिवार्य

केवायसी न केल्यास मिळणार नाही ₹२०००

केवायसी करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

मार्च महिना सुरु झाला तरीही पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झालेला नाही. पीएम किसान योजनेचा लाभ कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. पीएम किसानचे आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. २२वा हप्ता फेब्रुवारीत दिला जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र, अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. दरम्यान, पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. जर तुम्ही या नियमांचे पालन केले तरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

पीएम किसान योजनेसाठी केवायसी अनिवार्य (PM Kisan Yojana eKYC Mandatory)

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी केवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्ही जर केवायसी केली नाही तर तुम्हाला योजनेचा हप्ता मिळणार नाही. प्रत्येक हप्त्यावेळी तुम्हाला केवायसी करायची आहे. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने केवायसी करु शकतात.

पीएम किसान योजनेत वर्षभरात ३ हप्ते दिले जातात. दर ४ महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातात. त्यामुळे प्रत्येक हप्त्याआधी केवायसी करणे गरजेचे आहे. आता शेतकरी २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेक,

केवायसी करण्याची प्रोसेस (PM Kisan Yojana eKYC Online Process)

तुम्हाला सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

तिथे फार्मर्स कॉर्नरवर जायचे आहे. त्यानंतर ईकेवायसीचा ऑप्शन निवडा.

यानंतर आधार कार्ड नंबर टाका. यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल.

ओटीपी टाकल्यानंतर तुमची केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.

ऑफलाइन पद्धत

तुम्ही ऑफलाइन पद्धतीनेही केवायसी करु शकतात. तुम्ही तुमच्या गावातील CSC सेंटरवर जायचे आहे. यानंतर मोबाईल नंबर आणि आधार नंबर द्यायचा आहे.यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसानचा लाभ मिळवण्यासाठी ही ४ कामे आताच करा, अन्यथा ₹२००० विसरा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com