

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची बातमी
होळीआधी येऊ शकतो २२वा हप्ता
तुम्हाला पैसे येणार की नाही?
देशातील ९ कोटींपेक्षा जास्त शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहेत. पीएम किसान योजनेत आतापर्यंत २१ हप्ते देण्यात आले आहेत. शेतकरी २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. हा हप्ता फेब्रुवारीमध्ये येणार असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न विचारण्यात आले आहेत.
पीएम किसान योजनेचा २१ वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात देण्यात आला होता. तो हप्ता येण्यासही उशिर झाला होता. त्यानंतर आता २२वा हप्ता येण्यास उशिर होत आहे.दरम्यान, आता होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असं सांगण्यात येत आहे.
होळीआधी शेतकऱ्यांना मिळणार ₹२०००
मिडिया रिपोर्टनुसार, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २२वा हप्ता २५ फेब्रुवारीनंतर येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याआधी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पीएम किसानचा हप्ता होळीआधी दिला जाईल, असं सांगितलं जात आहे.
होळीआधी शेतकऱ्यांना मिळणार ₹२०००
होळी २ आणि ३ मार्च रोजी आहे. या कालावधीत शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता दिला जाऊ शकतो. सणाचा मूहूर्त साधत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, असं सांगितले जात आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल. ही तारीख अधिकृत वेबसाइटवर अपडेट होईल.
तुम्हाला पैसे मिळणार का? (PM Kisan Yojana Status Check)
तुमचे नाव यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
यानंतर बेनिफिशियरी लिस्टवर चेक करा.
यानंतर तुम्हाला Know Your Status या ऑप्शनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला पैसे येणार की नाही हे कळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.