PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ही एक चूक पडू शकते महागात, मिळणार नाही ₹२०००;लगेच चेक करा अपडेट

PM Kisan Yojana Installment Update: पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला केवायसी करायची आहे. जर तुम्ही केवायसी केले नाही तर योजनेचा हप्ता मिळणार नाही.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On
Summary

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी करा

एक चूक पडू शकते महागात

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशातील जवळपास ९ कोटी शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात. पीएम किसान योजनेत वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. या योजनेत आतापर्यंत २१ हप्ते दिले आहेत. २२वा हप्ता कधी मिळणार याची शेतकरी वाट पाहत आहेत. दरम्यान, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना एक चूक महागात पडू शकते. या चुकीमुळे त्यांचा हप्ता रखडला जाऊ शकतो. त्यामुळे हप्ता येण्याआधी ही गोष्ट चेक करा.

पीएम किसान योजनेचा हप्ता येण्याआधी तुमची सर्व माहिती योग्य आहे का हे जाणून घ्या. अन्यथा तुम्हाला हप्ता येणार नाही.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

ईकेवायसी अपडेट अनिवार्य (PM Kisan Yojana eKYC Update Mandatory)

पीएम किसान योजनेत रजिस्ट्रेशन केल्यानंतर ईकेवायसी करणे गरजेचे आहे. जर तुम्ही ईकेवायसी केले नाही तर तुम्हाला फटका बसू शकतो. तुमचे व्हेरिफिकेशन पेंडिंग दिसते. त्यामुळे तुमचा हप्ता रखडला जाऊ शकतो. अनेकदा अर्ज केल्यानंतर तुम्हाला ठरावीक कालावधीनंतर कागदपत्र अपडेट करावे लागतात. आधार आणि मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन असणे गरजेचे आहे. याबाबत तुम्ही पोर्टलवर जाऊन माहिती मिळवू शकतात.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसानचे ₹२००० कधीही येऊ शकतात; त्याआधी हे काम कराच, अन्यथा...

या गोष्टी लक्षात ठेवा

पीएम किसान योजनेचा लाभ फक्त त्याच शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांची जमिनीची कागदपत्रे अपडेट आहेत. जर राज्याच्या रेकॉर्डमध्ये तुमच्या जमिनीबाबत माहिती नसेल तर तुमचा हप्ता रोखला जाऊ शकतो. तसेच जमीन जर ट्रान्सफर केली असेल तर त्याचेही अपडेट करावे लागणार आहे. अन्यथा तुम्हाला योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाहीये.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: एक चूक अन् ₹२०००चा हप्ता थांबला, राज्यातील १.७० लाख शेतकर्‍यांना झटका; पीएम किसान योजनेबाबत अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com