PM Kisan Yojana: एक चूक अन् ₹२०००चा हप्ता थांबला, राज्यातील १.७० लाख शेतकर्‍यांना झटका; पीएम किसान योजनेबाबत अपडेट

PM Kisan Yojana Update: पीएम किसान योजनेत ३० लाख शेतकऱ्यांना २००० रुपये मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने त्यांना फटका बसू शकतो.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam tv
Published On
Summary

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट

३० लाख शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ

महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांचीही नावे

केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेतील लाखो लाभार्थ्यांना २२वा हप्ता न मिळण्याची शक्यता आहे. सरकारने ३० लाख शेतकऱ्यांची नावे सध्या तरी वगळली असल्याची माहिती समोर आले आहे. आधार आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने या शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आधार आणि बँक अकाउंट लिंक करायचे आहे अन्यथा त्यांना २२वा हप्ता मिळणार आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २२वा हप्ता कधी येणार? या दिवशी येऊ शकतात ₹२०००

विविध राज्यातील लाखो शेतकरी योजनेतून बाद

पीएम किसान योजनेत उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक शेतकऱ्यांचे आधार आणि बँक अकाउंट लिंक नाहीये. गुजरातमधील २.९० लाख शेतकऱ्यांनी अकाउंट लिंक केले नाही. केरळमधील ६८,७९८ शेतकऱ्यांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नाही.महाराष्ट्रातील जवळपास १,७२,३४९ शेतकऱ्यांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसानचे २००० रुपये मिळणार नाहीये.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसानचा २२वा हप्ता कधी येणार? ₹२००० बाबत मोठी अपडेट

महाराष्ट्रातील १.७० लाख शेतकऱ्यांवर टांगती तलवार

महाराष्ट्रातीलदेखील लाखो शेतकऱ्यांचे नाव योजनेतून वगळण्यात आले आहे.१,७२,३४९ शेतकऱ्यांचे आधार आणि बँक अकाउंट लिंक नसल्याने त्यांना हा फटका बसणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना लवकरात लवकर हे काम करण्यास सांगितले आहे. जर तुम्ही अजूनही आधार आणि बँक अकाउंट लिंक केले नसेल तर तुम्हाला फटका बसू शकतो. तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने आधार आणि बँक अकाउंट लिंक करु शकता.

PM Kisan Yojana
Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार २०,००० रुपये; आताच करा गुंतवणूक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com