PM Kisan Yojana: ३० लाख शेतकऱ्यांना झटका, ₹२००० झाले बंद; पीएम किसान योजनेतून वगळले, कारण काय?

PM Kisan Yojana 30 Lakh Farmer will not Get 22nd Installment: पीएम किसान योजनेतून जवळपास ३० लाख लाभार्थ्यांना वगळले असल्याचे समोर आले आहे. या शेतकऱ्यांना आता २२वा हप्ता मिळणार नाहीये.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam Tv
Published On

पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेतून लाखो शेतकऱ्यांना आता वगळण्यात आले आहे. कोट्यवधी शेतकरी पीएम किसानच्या २२व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. त्यातच आता लाखो लाभार्थ्यांना योजनेचा हप्ता मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत ₹२००० तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

३० लाख लाभार्थ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा हप्ता (30 Lakh Farmer will not get PM Kisan Yojana Installment)

पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही निकषांमध्ये बसायला हवे. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार आणि बँक अकाउंट लिंक असायला हवे. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, ६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत ३०,१८,३६१ शेतकऱ्यांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक नाहीये. त्यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांना २२वा हप्ता मिळणार नाही.

मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांची लिस्ट जारी केली आहे. लिस्टमधील माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील १० लाख शेतकऱ्यांनी आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक केलेले नाही. महाराष्ट्रातील जवळपास १,७२, ३४९ शेतकऱ्यांनी आधार आणि बँक अकाउंट लिंक केलेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता लाभ मिळणार नाहीये.

PM Kisan Yojana
UK Politics: मुस्लीम महिला होणार ब्रिटनची PM; कोणाचं नाव आहे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत?

आधार आणि बँक अकाउंट लिंक करणे गरजेचे

शेतकऱ्यांनी बँक अकाउंट लिंक करायचे आहे. हे काम तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने करु शकतात.

ऑनलाइन प्रोसेस

सर्वात आधी तुम्हाला बँकेच्या साइटवर जायचे आहे. तिथे तुम्हाला आधार सिडिंग किंवा अपडेट असा ऑप्शन दिसेल.

बँक अॅपवर जाऊन लॉग इन करुन आधार लिंकचा ऑप्शन निवडा.

याचसोबत तुम्ही UIDAI पोर्टलवर जाऊनदेखील आधार लिंक करु शकतात.

ऑफलाइन प्रोसेस

सर्वात आधी तुम्हाला बँकेच्या शाखेत जायचे आहे. यानंतर आधार कार्ड आणि पासबुक दाखवायचे आहे.

यानंतर बँकेने दिलेला आधार लिंक फॉर्म भरा.

यानंतर एसएसएस किंवा एटीएमद्वारे आधार लिंक करु शकतात.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: पीएम किसानचे ₹२००० कधीही येऊ शकतात; त्याआधी हे काम कराच, अन्यथा...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com