

शबाना महमूद ब्रिटनच्या पंतप्रधान झाल्या तर त्या ब्रिटनच्या पहिल्या मुस्लिम पंतप्रधान असतील.
एपस्टीन फाइल्सनंतर शबाना महमूद यांचं नाव चर्चेत
जागतिक राजकारणात ब्रिटनच्या नेतृत्वाबाबत उत्सुकता
एपस्टाईन फाइल्स उडकीस आल्यापासून जगभरातील अनेक नेते राजीनामे देऊ लागलेत. एपस्टाईन फाइल्समुळे राजकारणात मोठा गोंधळ उडालाय. आता एपस्टाईन फाइल्स ब्रिटिश पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचल्या आहेत. जरी ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर कधीही जेफ्री एपस्टाईन यांना भेटले नाहीत, पण अनेक जगातील नेत्यांशी आणि व्यक्तींशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दलचे खुलासे होत आहेत.
त्यामुळे आता ब्रिटिश पंतप्रधानांवर याचा प्रभाव पडणार आहे. त्यांचे पदही धोक्यात आले आहे. ब्रिटीश राजघराण्याचे माजी सदस्य प्रिन्स अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर हे एपस्टाईनशी असलेल्या मैत्रीमुळे आधीच चौकशीच्या भोवऱ्यात सापडलेत. एपस्टाईनशी असलेल्या संबंधांमुळे वॉशिंग्टनमधील ब्रिटनचे राजदूत पीटर मँडेलसन यांनाही पदावरून हटवण्यात आले आहे.
२०२४ मध्ये एपस्टाईनशी संबंध असूनही कामगार नेते मँडेलसन यांची वॉशिंग्टनमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांना त्यांच्याच कामगार पक्षातील नेत्यांच्या दबावाचा सामना करावा लागतोय. आता या सर्व वादांमध्ये कीर स्टारमर यांचे पंतप्रधानपद धोक्यात आले आहे. कीर स्टारमर यांच्या जागी शबाना महमूद यांचे नाव ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.
शबाना महमूद सध्या कीर स्टारमरच्या पक्षाच्या मित्रपक्षातील नेत्या आहेत. त्या ४५ वर्षांच्या वकील आणि राजकारणी आहेत. पक्षात त्यांना एक प्रेरक वक्ता आणि लेबर पक्षाच्या डाव्या विचारसरणीतील एक महत्त्वाकांक्षी नेत्या म्हणून ओळखले जाते. शबाना महमूद यांचा जन्म बर्मिंगहॅम येथे झालाय. त्यांच्या आईचे नाव झुबेदा आणि महमूद अहमद आहे. ते मूळ पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील मीरपूर शहरातील रहिवाशी आहेत.
२०२५ मध्ये गृह कार्यालयात पदभार स्वीकारल्यापासून, त्यांना यूके सीमा सुरक्षा व्यवस्थापित करण्याची उच्चस्तरीय जबाबदारी देण्यात आलीय. शबाना यांनी २००२ मध्ये ऑक्सफर्डच्या लिंकन कॉलेजमधून कायद्याची पदवी मिळवली आहे. इन्स ऑफ कोर्ट स्कूल ऑफ लॉमधून बार व्होकेशनल कोर्स पूर्ण करून त्या बॅरिस्टर बनल्या आहेत. २०१० मध्ये, त्या रुशनारा अली आणि यास्मिन कुरेशी यांच्यासह पहिल्या महिला मुस्लिम खासदार होत्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.