Crime News : राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, तरुणीकडे शरीरसुखाची मागणी; अश्लील मेसेज पाठवायचा अन्...

Wardha Crime News : वर्धा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या मागणीच्या आरोपात दिवाकर गमे या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याला पुलगाव पोलिसांनी अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
Crime News : राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, तरुणीकडे शरीरसुखाची मागणी; अश्लील मेसेज पाठवायचा अन्...
Wardha Crime News Saam Tv
Published On
Summary
  • वर्ध्यात तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या आरोपात दिवाकर गमे यांना अटक

  • पीडित मुलीच्या तक्रारीवरून पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल

  • नोकरीचे आमिष दाखवत दीर्घकाळ छळ केल्याचा आरोप

  • पुलगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू

चेतन व्यास, वर्धा

Wardha POCSO Case Filed Against NCP Leader Diwakar Game वर्धा जिल्ह्यातून ‘जागतिक महिला दिना’च्या दिवशी समाजाला हादरवून टाकणारी ही घटना उघडकीस आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाशी संबंधित एका ज्येष्ठ नेत्यावर तरुणीकडे दीर्घकाळ शरीर सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. दिवाकर गमे (वय ७८ ) असे या आरोपीचे नाव असून पुलगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पुलगाव पोलिस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत आणि इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित तरुणी २०२२ मध्ये अवघ्या २१ वर्षांची असताना आरोपीने तिला नोकरीचे आमिष दाखवत, गेल्या सुमारे पाच वर्षांपासून तिच्याकडे सातत्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपीचे पीडित मुलीच्या कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे.

Crime News : राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, तरुणीकडे शरीरसुखाची मागणी; अश्लील मेसेज पाठवायचा अन्...
Shocking : बॉयफ्रेंडच निघाला हैवान; उसाच्या शेतात नेत ८ वीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, अत्याचारानंतर पीडितेसोबत केलं भयंकर

तसेच तीन दिवसांपूर्वी आरोपीने पीडितेला अश्लील फोटो आणि व्हिडिओ पाठवून छळ केल्याचा आरोप आहे. यामुळे त्रस्त झालेल्या पीडित तरुणीने अखेर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पुलगाव पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत ७ मार्चच्या सायंकाळी आरोपी दिवाकर गमे याला अटक केली. पोलिसांनी आरोपीचा मोबाईलही जप्त केला असून त्यातून आणखी धक्कादायक पुरावे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Crime News : राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक, तरुणीकडे शरीरसुखाची मागणी; अश्लील मेसेज पाठवायचा अन्...
Iran Israel War : युद्धाचा भडका! ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणवर मोठा हल्ला, तेहरानमधील तेल प्रकल्प उडवले; VIDEO समोर

दरम्यान, आरोपी हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाशी संबंधित एका दिग्गज नेत्याचा निकटवर्तीय असल्याची माहिती समोर येत असून या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com