

पीएम किसान योजनेबाबत महत्त्वाची अपडेट
१३ मार्चला शेतकऱ्यांना मिळणार २००० रुपये
या शेतकऱ्यांनाच मिळणार पैसे
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना १३ मार्च रोजी २००० रुपये मिळणार आहे. कालच सरकारने अधिकृत घोषणा केली. आता लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.पीएम किसान योजनेचे जवळपास ९ कोटींपेक्षा जास्त लाभार्थी आहेत. कोट्यवधी लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत. दरम्यान, यातही काही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. यामागे अनेक कारणे आहेत.
फक्त याच शेतकऱ्यांना मिळणार ₹२००० (PM Kisan Yojana Only These Farmers Will Get 2000 Rupees)
पीएम किसान योजनेसाठी काही अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. या अटींमध्ये बसलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत. एका कुटुंबातील फक्त एका शेतकऱ्यालाच योजनेचा लाभ मिळू शकतात.यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे गरजेचे आहे. याचसोबत आर्थिक उत्पन्नदेखील मर्यादेपेक्षा जास्त नसावे. या अटींमध्ये बसत असल्यास २००० रुपये मिळणार आहे. याचसोबत तुम्हाला जमिनीच्या कामाचे व्हेरिफिकेशन करायचे आहे. व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तुम्हाला पैसे मिळणार आहे.
ईकेवायसी अनिवार्य (PM Kisan Yojana eKYC Process)
पीएम किसान योजनेसाठी ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. ईकेवायसी केल्यानंतरच तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार आहे. तुम्ही अजून केवायसी केली नसेल तर आता करावी.
ईकेवायसी करण्यासाठी सर्वात आधी वेबसाइटवर जावे.
यानंतर फार्मर्स कॉनरवर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला केवायसीचा ऑप्शन दिसणार आहे. त्यावर क्लिक करा.
तुमचा आधार नंबर टाकावा. त्यानंतर तुमच्या नंबरवर ओटीपी येईल.
ओटीपी टाकल्यानंतर तुमची केवायसी पूर्ण होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.