
Tilak Varma Mumbai Indians : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या सामन्यामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये तिलक वर्मा रिटायर्ड आउट होऊन मैदानातून बाहेर पडला. संघाला गरज असताना आक्रमक खेळी होत नसल्याने त्याला डगआउटमध्ये बोलवण्यात आले होते. या प्रकरणामुळे मुंबई इंडियन्सचा डावखुरा फलंदाज तिलक वर्मा सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे.
तिलक वर्माच्या जागी आयत्या वेळी मिचेल सँटनरला मैदानात बोलावल्याने हार्दिक पंड्या आणि महेला जयवर्धने यांच्यावर टीका केली जात आहे. मुंबई विरुद्ध लखनऊ सामन्यापासून तिलक वर्माच्या रिटायर्ड आउटची चर्चा पाहायला मिळत आहे. तिलक वर्मासारखा चांगला खेळाडू मैदानात असतानाही सँटनरला का बोलावले असे लोक म्हणत आहेत.
पण मुंबई इंडियन्ससाठी तिलक वर्मा इतका महत्त्वपूर्ण कधीपासून झाला? चला जाणून घेऊयात... तिलक वर्माला मुंबई इंडियन्सच्या स्काउटिंग टीमने हेरले होते. आयपीएल २०२२ च्या लिलावामध्ये मुंबई इंडियन्सने तिलकवर सर्वाधिक बोली लावली होती. त्याच सीझनमध्ये तिलकला मुंबईकडून खेळायची संधी मिळाली. तिलकने त्याला मिळालेल्या संधीचे सोने केले.
आयपीएल २०२२ मध्ये तिलकने ३६.०९ च्या सरासरीने ३९७ धावा केल्या. तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट १३१.०२ इतका होता. २०२३ मध्ये त्याने ४२.८८ च्या सरासरीने ३४३ धावा केल्या. त्यावेळेस त्याचा स्ट्राईक रेट १६४.११ आहे. या कामगिरीमुळे त्याला टीम इंडियाच्या टी-२० संघात पदार्पण करता आले होते. तिलक वर्मासाठी आयपीएल २०२४ वर्ष खास होते. या सीझनमघ्ये तिलकने ४१६ धावांची विस्फोटक कामगिरी केली होती. तिलकने भारताकडून खेळताना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य दाखवले. टी-२० फॉरमॅटमध्ये तिलक वर्मा चमकला आहे.
सध्या रोहित शर्मा आउट ऑफ फॉर्म आहे. रियान रेकल्टन आणि विल जॅक्स देखील मागच्या सामन्यांमध्ये आवश्यक खेळ करु शकले नाहीयेत. सलामीवीर अपयशी ठरत असल्याने सूर्यकुमार यादववर दबाव येत आहे. हार्दिक पंड्या फिनिशरच्या भूमिकेत दिसत आहे. तेव्हा सूर्या आणि हार्दिक यांना साथ देण्यासाठी संघात तिलक वर्मा असणे आवश्यक आहे. तिलक डावखुरा असल्याने राइट-लेफ्ट कॉम्बिनेशन सुद्धा सेट होत आहे. मागच्या दोन सामन्यांमध्ये तणावामुळे तिलकला आवश्यक वेळी फटकेबाजी करता येत नसली तरी, तो सूर्या आणि पंड्यासह मुंबईचा डाव सावरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.