Ajinkya Rahane: मी काही बोललो तर वाद...! प्रेस कॉन्फ्रेंसनंतर कोणावर संतापला अजिंक्य रहाणे?

Ajinkya Rahane press conference : मंगळवारी ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात रन्सचा अक्षरशः भडीमार झाला. दोन्ही टीम्सने मिळून ४० ओव्हर्समध्ये तब्बल ४७२ रन्स फटकावल्या आणि १० विकेट्स गेले.
Ajinkya Rahane Breaks Silence
Ajinkya Rahane Breaks Silencesaam tv
Published On

मंगळवारी आयपीएलमध्ये डबल हेडर खेळवण्यात आले. यावेळी पहिला सामना कोलकाता नाईड रायडर्स विरूद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यामध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेने कॅप्टन्स इनिंग खेळली. मात्र उर्वरित फलंदाजांना सामना जिंकवून देता आला नाही.

मंगळवारी ईडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात रन्सचा पाऊस पडला. ४० ओव्हर्समध्ये १० विकेट्स पडल्या आणि ४७२ रन्स झाले. लखनऊ सुपर जायंट्सकडून ४ रन्सने पराभव झाल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणेला पिच क्युरेटरवर संतापला.

Ajinkya Rahane Breaks Silence
PBKS vs CSK: पंजाबविरूद्ध चेन्नईच्या पराभवासाठी 'हा' खेळाडू जबाबदार? मोक्याच्या क्षणी मैदान सोडून गेला आणि...!

सामन्यानंतर झालेल्या रहाणेने पत्रकार परिषदेत रहाणे म्हणाला की, मी काही बोललो तर वाद निर्माण होईल. आयपीएलमधील विचारलं असता रहाणे म्हणाले की, क्युरेटर पब्लिसीटीमुळे खूश आहेत. ते याठिकाणचं पीच किंवा मैदानाबद्दल काहीही बोलणार नाही.

काय म्हणाला अजिंक्य रहाणे?

रहाणे पुढे म्हणाला की, या विकेटबद्दल खूप काही बोललं गेलं आहे. मी काही बोललो खूप मोठा गोंधळ होईल. आमच्या क्युरेटरला आधीच खूप प्रसिद्धी मिळालीये आणि मला वाटतं की तो त्या प्रसिद्धीमुळे खूश आहे. मी इथल्या विकेटबद्दल काहीही बोलणार नाही. याविषयी मी आयपीएल आणि संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा करेन.

Ajinkya Rahane Breaks Silence
Rohit Sharma: रोहित शर्माची मुंबई इंडियन्समधील किंमत कमी झाली? धक्कादायक कारणामुळे चाहत्यांच्या मनात शंका

नेमका वाद काय आहे?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडन गार्डन्सचे पिच क्युरेटर सुजन मुखर्जी यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी स्पिनला अनुकूल पीच तयार करण्याची केकेआरचा कर्णधार रहाणेची विनंती नाकारली होती. त्यावेळी रहाणेने असंही म्हटलं की, त्याला खेळपट्टीबद्दल कोणतीही तक्रार नाही, परंतु टीमला या खेळपट्टीवर काही फिरकी गोलंदाजी करायची आहे. कोट चंद्रकांत पंडित यांनीही कर्णधाराच्या शब्दांना दुजोरा देत म्हटलेलं की, 'घरगुती मैदानाचा फायदा मिळाल्याने कोणाला आनंद होणार नाही'.

Ajinkya Rahane Breaks Silence
Hardik Pandya : चौथ्या पराभवानंतर हार्दिक खचला; म्हणाला, मला कळत नाही काय बोलू...!

हैदराबाविरूद्धच्या सामन्यानंतर काय म्हणालेला रहाणे?

गेल्या आठवड्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात हा वाद मिटल्यासारखं वाटलं होतं. त्यावेळी रहाणेने खेळपट्टीबाबत समाधानी असल्याचं म्हटलं होतं. तो म्हणाला, "मी खेळपट्टीवर खरोखरच खूश आहे. हे पीच आमच्या फिरकी गोलंदाजांना अनुकूल असणार आहे. घरच्या मैदानावर तुम्हाला जे हवं ते मिळणार आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com