
चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध पंजाब किंग्ज यांच्यामध्ये मंगळवारी सामना रंगला होता. या सामन्यामध्ये पंजाबने १८ रन्सने विजय मिळवला. चेन्नईची पराभवाची मालिका काही संपताना दिसत नाही. टीमसमोर २२० रन्सचं मोठं लक्ष्य होतं, परंतु टीम ते पूर्ण करू शकली नाही. आता टीम खूप अडचणीत सापडली असून या ठिकाणहून टॉप ४ मध्ये स्थान मिळवणं काहीसं कठीण मानलं जातंय.
पंजाब विरूद्ध सीएसके या सामन्यादरम्यान पुन्हा एकदा एक आश्चर्यकारक घटना घडली. सीएसकेकडून फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी आलेल्या खेळाडूने सामन्याच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे १८ व्या ओव्हरमध्ये मैदान सोडलं. यानंतर, सीएसकेच्या विजयाची शक्यता आणखी कमी झाली. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणीही नसून ड्वेन कॉन्वे होता.
पंजाब किंग्जने दिलेल्या २२० रॅन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सीएसके टीम मैदानात आली तेव्हा सुरुवात चांगली झाली. मात्र त्यानंतर त्यांची फलंदाजी गडगडली. रचिन रवींद्र आणि ड्वेन कॉनवे यांनी मिळून ६१ रन्सची पार्टनरशिप केली. पहिल्या सहा ओव्हरमध्ये सीएसके टीमने एकही विकेट गमावली नव्हती. रचिन रवींद्र सातव्या ओव्हरमध्ये ३६ रन्सवर बाद झाला. यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडही फक्त एका रनवर बाद झाला.
एका बाजूने ड्वेन कॉनवे रन्स करत होता मात्र तो फार हळू फलंदाजी करत होता. एमएस धोनी सीएसकेसाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला, पण तो अपयशी ठरला. यावेळी १८ व्या ओव्हरमध्ये ड्वेन कॉनवे रिटायर्ड आऊट झाला त्यानंतर त्याच्या जागी रवींद्र जडेजा आला. मात्र त्यालाही खास कामगिरी करता आली नाही.
या सामन्यातही सीएसकेने तीच चूक केली जी मुंबई इंडियन्सने केली होती. तिलक वर्मा सेट फलंदाज असून तो रिटायर्ड आऊट झाला. सीएसकेने देखील हीच चूक केली. ड्वेन कॉन्वे जरी धीम्या गतीने खेळत होता तरी त्याला पीचची चांगली माहिती होती. त्यामुळे, त्याच्याकडून दोन मोठ्या फटक्यांची अपेक्षा केली जाऊ शकत होती.
रवींद्र जडेजा ज्यावेळी मैदानात उतरला आहे तेव्हा त्याच्याकडून अशाच अपेक्षा करता येणं योग्य नाही. या दृष्टिकोनातून पाहिलं तर सीएसकेच्या पराभवासाठी जबाबदार ड्वेन कॉन्वे होता. त्याने टीमला अर्ध्यावर सोडून जाणं योग्य नव्हतं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.