MI vs RCB : 6 बॉल, 19 रन, 3 कॅच अन्...; शेवटच्या ओव्हरचा ड्रामा; मुंबईने कुठे गमावला सामना?

MI vs RCB : मुंबईसाठी या हंगामातील हा चौथा पराभव ठरला. पुन्हा एकदा फलंदाजांनी निर्णायक क्षणी अपेक्षाभंग केला आणि जिंकता येऊ शकणारा सामना गमावला. अखेरच्या ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडूवर नेमकं काय घडलं आणि कसा सामना मुंबईच्या हातून निसटला.
MI vs RCB
MI vs RCBsaam tv
Published On

वानखेडे स्टेडियनममध्ये मुंबई इंडियन्सला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूने या सामन्यात १२ रन्सने विजय मिळवला. यंदाच्या सिझनमधील मुंबईचा हा चौथा पराभव होता. पुन्हा एकदा मुंबईच्या फलंदाजांनी हातात आलेली मॅच गमावली. या पराभवामुळे चाहते देखील नाराज आहेत.

शेवटच्या ओव्हरमध्ये १९ रन्सची गरज

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सला विजयासाठी १९ रन्सची आवश्यकता होती. आयपीएल २०२५ च्या या २० व्या सामन्यात आरसीबीसाठी कृणाल पंड्या गोलंदाजी करत होता. यावेळी मिचेल सँटनर नमन धीरसोबत क्रीजवर होता. पीच फलंदाजीसाठी सोपी होती आणि त्यामुळे या धावा होण्याची शक्यताही जास्त होती.

नमन आणि सँटनर दोघांमध्येही लांब सिक्स सहज मारण्याची क्षमता आहे. तरीही, आरसीबीने सामना १२ धावांनी जिंकला. दरम्यान शेवटच्या प्रत्येक बॉलवर काय घडलं आणि सामना कसा आणि कुठे फिरला ते पाहूयात.

पहिला बॉल

चेंडू ऑफ स्टंपच्या बराच बाहेर होता. यानंतरही मिचेल सँटनरने एक जोरदार शॉट मारला. पण चेंडू जास्त उंचावर गेला नाही आणि लाँग ऑफवर टीम डेव्हिडने त्याचा कॅच घेतला.

MI vs RCB
MI vs RCB: आरसीबीविरूद्ध बुमराह-रोहितचं होणार कमबॅक? पाहा कशी असेल दोन्ही टीम्सची प्लेईंग 11

दुसरा बॉल

दीपक चहर क्रीजवर आल्यानंतर त्याने मिड-विकेटकडे मोठा शॉट खेळला. बॉल फिल सॉल्टने पकडला पण तो सीमारेषेच्या बाहेर जात होता. त्याने बॉल टिम डेव्हिडकडे फेकला आणि त्याने तो सहज पकडला. कृणाल पंड्याला दुसरी विकेट मिळाली.

तिसरा बॉल

ट्रेंट बोल्टला टाकलेला हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता आणि अंपायरने तो वाईड दिला.

तिसरा बॉल

कृणारने हा बॉल बाऊंसर टाकला आणि बोल्टने एक रन घेतला. यावेळी मुंबईला ३ बॉल्समध्ये १७ रन्सची गरज होती.

MI vs RCB
MS Dhoni: मी कधीच विचार केला नव्हता की...! निवृत्तीच्या प्रश्नावर धोनी जरा स्पष्टच बोलला, केला मोठा खुलासा

चौथा बॉल

नमन धीर स्ट्राईकवर होता आणि त्याने शॉर्ट थर्ड मॅनवर फोर लगावली. मुंबईला शेवटच्या दोन चेंडूत जिंकण्यासाठी १३ रन्सची आवश्यकता होती.

पाचवा बॉल

कृणाल पंड्याने नमन धीरला बाद केलं. नमनने लेग साईडवरचा लो फुल टॉस डीपमध्ये असलेल्या फिल्डरकडे मारला आणि यश दयालने त्याचा कॅच घेतला.

MI vs RCB
IPL 2025: वॉशिंग्टन सुंदरच्या विकेटने मैदानात राडा; शुभमन गिलही अंपायरवर संतापला, SRH ने खरंच केली चिटींग?

सहावा बॉल

जसप्रीत बुमराह नवीन फलंदाज म्हणून आला आणि त्याला या बॉलवर एकही रन घेतला नाही. अशाप्रकारे, कृणाल पंड्याने २० व्या षटकात ६ रन्स देऊन ३ विकेट्स घेतले आणि आरसीबीला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com