
मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा स्टार फलंदा विराट कोहलीचा राग अनावर झाला. आपल्या फलंदाजीने चाहत्यांना खूश करणारा कोहली मुंबई विरुद्धच्या सामन्यात चांगलाच संतापला होता. विराट कोहलीच्या संतापाचं कारण होतं, आरसीबीच्या खेळाडूंची मिस फिल्डिंग.
मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या आयपीएल २०२५ च्या २० व्या सामन्यात विराट कोहली संतापला होता. आधी जेव्हा त्याची विकेट पडली होती, त्यावेळी त्याने ड्रेसिंग रूममध्ये बॅट फेकून आपला राग व्यक्त केला होता. क्षेत्ररक्षण करताना कोहली दुसऱ्यांदा संतापला होता. आरसीबीच्या खेळाडूने केलेली चूक पाहून कोहली रागवला. त्यावेळी त्याने त्याची टोपी जमिनीवर फेकली.
वानखेडे मैदानावर विराट कोहलीचा भयंकर राग पाहायला मिळाला. मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळताना यश दयाल १२ वं षटक टाकत होता. यश दयालच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने फटका मारला. यशला झेल घेण्याची संधी होती, पण यष्टीरक्षक जितेश शर्माही झेल घेण्यासाठी धावला. झेल घेण्याच्या प्रयत्नात दोन्ही खेळाडूंमध्ये टक्कर झाली, त्यामुळे दोघांच्या हातातून झेल निसटला.
चेंडू उंच हवेत असताना यष्टीरक्षक जितेश झेल घेण्यासाठी प्रयत्न करत होता. पण यशने त्याला थांबण्यास सांगितलं. पण त्याने यशचं ऐकलं नाही. त्याच गोंधळात दोन्हांची टक्कर झाली. दोन्ही खेळाडूंमधील हा गोंधळ पाहून विराट कोहली खूप संतापला. त्याने रागाच्या भरात आपल्या डोक्यावरील टोपी काढली आणि जमिनीवर फेकली.
आरसीबीच्या खेळाडूंकडून झेल निसटला तेव्हा त्यावेळी सूर्यकुमार हा २७ धावांवर खेळत होता. सूर्यकुमार हा २७ धावांवर माघारी परतला असता पण,आरसीबी खेळाडूंच्या गोंधळामुळे त्याला जीवनदान मिळालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.