
कोलकाता संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पाचव्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी कोलकाता संघाने आपल्या टीममध्ये बदल केलाय. लखनऊच्या नवाबांना रोखण्यासाठी स्पेंसर जॉनसनचा संघात समावेश केलाय.
कोलकातामधील ईडन गार्डन्सवर कोलकाता नाइट रायडर्स आणि लखनऊ सुपरजायंट्स आमनेसामने आलेत. आयपीएल २०२५ मधील दोन्ही संघाचा हा पाचवा सामना आहे. केकेआर आणि लखनऊमधील हा सामना ६ एप्रिल रोजी होणार होता, परंतु राम नवमीमुळे या सामन्याची तारीख बदलण्यात आली होती.
आज हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होणार आहे. केकेआर संघाचं नेतृत्व अजिंक्य राहणे करतोय. राहणेच्या नेतृत्त्वात संघाने चार सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय मिळवलाय. तर ऋषभ पंतच्या नेतृत्त्वात लखनऊच्या संघाने दोन विजय मिळवले आहेत.
आजच्या सामन्यात केकेआरने स्पेंसर जॉनसनचा आपल्या संघात समावेश केलाय. स्पेंसर जॉनसनची भेदक गोलंदाजी लखनऊच्या फलंदाजांना मोठी खेळी खेळण्यापासून रोखणार अशा अपेक्षेनं संघ कर्णधाराने त्याला संधी दिलीय. दरम्यान स्पेंसर जॉनसनचा आयपीएलमध्ये मोठा पराक्रम केलाय. आयपीएलमध्ये डेथ बॉलर म्हणून त्याने ओळख निर्माण केलीय.
त्याने २०२३-२४ बीबीएल फायनलमध्ये ब्रिस्बेन हीटच्या जेतेपदासाठी मोठं योगदान दिलं होतं. जॉन्सनचा प्रथम श्रेणी क्रिकेटचा प्रवास २० फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झाला. यात त्याने व्हिक्टोरियाविरुद्ध ६/८७ च्या आकडेवारीसह आपला प्रभाव पाडला.
मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (wk/c), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, आवेश खान, दिग्वेश सिंग राठी.
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, वैभव अरोरा, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.