Virat Kohli Record : शतक हुकलं, पण इतिहास रचला; विराट कोहली अनोखा विक्रम करणारा ठरला भारतीय फलंदाज

Virat Kohli news : विराट कोहली अनोखा विक्रम करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने आज इतिहास रचला आहे.
Virat Kohli
Virat Kohli News X
Published On

विराट कोहलीने सोमवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअवर आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरोधात जबरदस्त खेळी खेळली. विराटने मुंबई इंडियन्स विरोधात फलंदाजी करताना अनोखा विक्रम केला. विराटने हटके फलंदाजी करत टी२० क्रिकेटमधील टॉप ५ फलंदाजांच्या यादीत सामील झाला. गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली या विक्रमापासून दूर होता. मात्र, विराटने आक्रमक खेळ दाखवत नवा इतिहास रचला आहे. यामुळे विराट अनोखा विक्रम करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

टी२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ ५ फलंदाजांनी १३ हजारांहून अधिक धावा कुटल्या आहेत. टी२० इंटरनॅशनल आणि आयपीएल स्पर्धेतील मिळून १३ हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. भारतीय खेळाडू फक्त आयपीएल स्पर्धा खेळतात. परंतु जगभरातील इतर खेळाडू इतर लीगमध्ये सहभाग नोंदवतात. या विक्रमात इतर लीगच्याही धावा मोजल्या जातात. याचदरम्यान, विराट कोहलीने १३ हजार धावांचा आकडा पार केला आहे.

टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने ४६३ सामन्यात १४,५६२ धावा कुटल्या आहेत. त्यानंतर क्रमवारीत एलेक्स हेल्सचं नाव दुसरं येतं. त्याने ४९४ सामन्यात १३६१० धावा कुटल्या आहेत. तिसरा क्रमांक शोएब मलिकाचा आहे. शोएबने ५५५ टी२० सामन्यात १३५५७ धावा केल्या आहेत. यानंतर कायरन पोलार्डचं नाव येते. पोलार्डने ६९५ टी२० सामन्यात १३५३७ धावा कुटल्या आहेत.

विराट कोहलीने टी२० च्या ४०३ सामन्यात १३००० धावा पूर्ण केल्या आहेत. विराटच्या आजच्या मॅचआधी १२,९८३ धावा होत्या. १३००० धावांचा आकडा पार करण्यासाठी फक्त १७ धावांची गरज होती. या १७ धावा सुरुवातीच्या काही चेंडूत पूर्ण केल्या. विराटनंतर एकही भारतीय खेळाडूने १३००० धावा केल्या नाहीत. विराट कोहलीच्या मागे डेव्हिड वार्नर आहे. त्याने ३९९ टी२० सामन्यात १२,९१३ धावा केल्या आहेत. वार्नर आता आंतरराष्ट्रीय सामने खेळत नाही. परंतु लीग स्पर्धेत खेळतो. त्याला १३००० धावांचा आकडा पार करण्याची संधी आहे.

विराटचं शतक हुकलं

मुंबई इंडियन्स विरोधात आरसीबीचा संघ प्रथम फलंदाजी करण्यास उतरला. ट्रेंट बोल्ट बाद झाल्यानंतर विराट कोहलीने संघाची कमान सांभाळली. विराटने आजच्या सामन्यात ६७ धावा कुटल्या. विराटचं काही धावांनी शतक हुकलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com