Virat Kohli : शानदार खेळीचा शेवट 'बॅडलक'ने, नको तो बॉल मारायला गेला अन् फसला, कोहली कर्णधाराच्या जाळ्यात कसा अडकला?

Virat Kohli Wicket : वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध बंगळुरू हा सामना रंगला आहे. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने २२१ धावा केल्या. या सामन्यामध्ये विराट कोहलीने सर्वाधिक ६७ धावा केल्या.
Virat Kohli Wicket
Virat Kohli Wicket X
Published On

Virat Kohli MI VS RCB : वानखेडे स्टेडियममध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु ही लढत रंगली आहे. या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करताना आरसीबीच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. सलामीसाठी आलेल्या विराट कोहलीने ४२ बॉल्सवर ६७ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाची धावसंख्या २०० पार गेली आहे.

चौदाव्या ओव्हरमध्ये मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या गोलंदाजीसाठी आला. ओव्हरच्या पहिल्या बॉलवर विराट कॅचआउट झाला. विराटने उजव्या बाजूला जात मागच्या बाजूला शॉट मारला. डीप मिड विकेटला उभा असलेला नमन धीरने चपळाई दाखवत बॉल अलगद झेलला. जर विराट कोहलीने तो शॉट नसता, तर तो बॉल वाइड गेला असता असे म्हटले जात आहे. वाइड बॉलवर चुकीचा शॉट मारल्याने विराट ७६ धावांवर बाद झाला.

Virat Kohli Wicket
Tilak Varma : लखनऊ विरुद्धच्या सामन्यातला 'तो' निर्णय महागात पडला, तिलक वर्मानं मोठं पाऊल उचललं, MI चं टेन्शन वाढवलं

जसप्रीत बुमराहने आजच्या सामन्यामधून आयपीएलमध्ये कमबॅक केले आहे. पाठीच्या दुखण्यामुळे तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. बऱ्याच दिवसांनी तो क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला. विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहची मजामस्ती सामन्यात पाहायला मिळाली. बुमराहच्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर विराट कोहलीने दमदार सिक्स मारला. सिक्सने विराटने बुमराहचे स्वागत केल्याचे सोशल मीडियावर म्हटले जात आहे.

Virat Kohli Wicket
MI VS RCB : भर मैदानात विराट कोहलीने बुमराहला धक्का दिला, मुंबई विरुद्ध बंगळुरू सामन्यात 'त्या' ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं?

२०१५ पासून जेव्हा-जेव्हा मुंबई आणि बंगळुरू हे दोन संघ आमनेसामने आले आहेत, तेव्हा मुंबईचा विजय झाला आहे. मुंबईने दहा वर्ष वानखेडेवर दबदबा टिकवून ठेवला आहे. दहा वर्षात एकदाही आरसीबीला वानखेडे स्टेडियमवर सामना जिंकता आलेला नाही. त्यामुळे आजचा सामना मुंबई जिंकणार की बंगळुरू याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Virat Kohli Wicket
MI vs RCB: घरच्या मैदानात मुंबईचं वस्त्रहरण; विराट-पाटीदारचं अर्धशतक, २२२ स्ट्राईक रेटवाली जितेशची तुफान खेळी

मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 -

विल जॅक्स, रायन रिकेल्टन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विग्नेश पुथूर

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूची प्लेईंग 11 -

फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.

Virat Kohli Wicket
Tilak Varma : तिलक वर्माशिवाय मुंबई इंडियन्सचं पान हलणार नाही! Retired Out करण्यापूर्वी विचार करायला हवा होता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com