
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंडियन प्रीमियर लीगमधील २० वा सामना होतोय. वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या संघ आमनेसामने आलेत. कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेत बेंगळुरूच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिलं. कर्णधार हार्दिक पांड्याचा निर्णय मात्र मुबंईसाठी महागात ठरला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २२१ धावा करत मुंबईला विजयासाठी २२२ धावांचे आव्हान दिलंय.
प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने फिल सॉल्टला बाद केलं. मात्र यानंतर विराट कोहलीने शानदार खेळी केली. पेड्डीकल ३७ धावा करून बाद झाला. मात्र कोहलीने आपला तुफानी खेळ चालू ठेवत २९ चेंडूत कोहलीने षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले. कोहली खेळपट्टीवर असेपर्यंत आरसीबीचं धावफलक हालते होते. परंतु कोहलीची विकेट गेली तेव्हा मुंबईने खेळावर वर्चस्व आणलं.
मुंबई संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने विराट कोहलीला झेलबाद केलं. कोहलीने ४७ चेंडूत ६७ धावा केल्या आहेत. दरम्यान कोहलीसोबत धमाकेदार फलंदाजी करणाऱ्या पेड्डीकलला विग्नेश पुथुरने बाद केलं. त्याने २२ चेंडूत ३७ धावा केल्या. विराट कोहलीच्या रुपाने आरसीबीला तिसरा धक्का बसला. पण त्यानंतर मैदानात उतरलेल्या रजत पाटीदारने धमाकेदार फलंदाजी करत अवघ्या २५ चेंडूत अर्धशतक केलं. पाटीदार आणि जितेश या दोघांनी अर्धशतकीय भागीदारी केली. दोघांनी २१ चेंडूत ५४ धावा केल्या.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने या हंगामात आतापर्यंत तीनपैकी दोन सामने जिंकलेत. मागील सामन्यात गुजरात टायटन्सने त्यांना पराभूत केलं होतं. त्यामुळे परत विजयाच्या ट्रकवर येण्यासाठी बेंगळुरूचा संघ उत्सुक असेल. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्सने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत, त्यात केवळ एकच सामना जिंकलाय. त्यामुळे मुंबईसाठी आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघ बंगळुरूवर नेहमीच वर्चस्व गाजवत आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत 33 सामने खेळले गेले आहेत, ज्यामध्ये मुंबईने 19 जिंकले आहेत. तर बेंगळुरूने 14 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन):
विल जॅक, रायन रिकेल्टन, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन):
फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.