srh saam tv
Sports

IPL 2025: सनरायझर्स हैदराबादच्या फॅन्ससाठी गुड न्यूज! ६ कोटीत घेतलेला विस्फोटक फलंदाज संघात परतला

Nitish Kumar Reddy: येत्या काही दिवसांत आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबाद संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. संघातील अष्टपैलू खेळाडू नितीश रेड्डी पूर्णपणे फिट असून संघात कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे.

ही सनरायझर्स हैदराबादच्या फॅन्ससाठी आनंदाजी बातमी आहे. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता आगामी हंगामात तो आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने विरोधी संघासाठी डोकेदुखी ठरु शकतो. गेल्या हंगामातही त्याने दमदार कामगिरी केली होती.

नितीश रेड्डीला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान भारतीय संघात संधी देण्यात आली होती. या मालिकेत त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. त्यानंतर तो दुखापतग्रस्त झाला होता.

गेल्या काही दिवसांपासून तो आपली फिटनेस पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात होता. आता त्याने बंगळुरुतील एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. यासह फिजिओने त्याला खेळण्यासाठी हिरवं कंदीलही दाखवलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत धावांचा पाऊस पाडल्यानंतर, तो २२ जानेवारीला इंग्लंडविरुद्ध टी-२० सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात त्याने गोलंदाजी किंवा फलंदाजी केली नव्हती. त्याने दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी नेट्समध्ये सराव केला. मात्र दुखापतीमुळे त्याला या मालिकेतून बाहेर पडावं लागलं होतं.

हैदराबादकडून धावांचा पाऊस पाडला.

आयपीएल २०२४ स्पर्धेत नितीश रेड्डीच्या फलंदाजीचा कहर पाहायला मिळाला होता. या स्पर्धेत त्याने धावांचा पाऊस पाडला होता. ही कामगिरी पाहता, त्याला भारतीय संघात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने धावांचा पाऊस पाडला. यादरम्यान आयपीएल २०२५ स्पर्धपूर्वी झालेल्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने त्याला ६ कोटी रुपये मोजून रिटेन केलं. लवकरच तो भारती संघासोबत जोडला जाणार आहे. हैदराबादचा पहिला सामना २३ मार्चला राजस्थान रॉयल्सविरुद्ध होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

SCROLL FOR NEXT