Nitish Reddy Catch: एकच नंबर! नितीश रेड्डीने हवेत डाईव्ह मारत घेतला भन्नाट कॅच; VIDEO एकदा पाहाच

IND vs ENG 1st T20I, Nitish Reddy Catch: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्यात नितीश रेड्डीने डाईव्ह मारत शानदार झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
Nitish Reddy Catch: एकच नंबर! नितीश रेड्डीने हवेत डाईव्ह मारत घेतला भन्नाट कॅच; VIDEO एकदा पाहाच
nitish reddytwitter
Published On

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना १३२ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ७ गडी राखून शानदार विजय मिळवला. यासह मालिकेत १-० ने आघाडी घेतली. या सामन्यादरम्यान भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डीने एक शानदार झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

रेड्डीने घेतला भन्नाट झेल

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरू होती. त्यावेळी १७ वे षटक टाकण्यासाठी वरुण चक्रवर्ती गोलंदाजीला आला. या षटकातील पहिल्याच चेंडूवर बटलरने मोठा षटकार मारला. या शॉटनंतर दुसऱ्या चेंडूवरही त्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला.

मात्र यावेळी त्याचा प्रयत्न फसला. कारण चेंडूला उंची तर मिळाली पण चेंडू हवा तितका लांब गेला नाही. सक्वेअर लेगला असलेल्या नितीश रेड्डीने शानदार झेल घेतला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Nitish Reddy Catch: एकच नंबर! नितीश रेड्डीने हवेत डाईव्ह मारत घेतला भन्नाट कॅच; VIDEO एकदा पाहाच
IND vs ENG: गुरु तसा शिष्य! अभिषेकने मोठ्या रेकॉर्डमध्ये युवराज सिंगची केली बरोबरी

बटलरची तुफान फटकेबाजी

इंग्लंडकडून फलंदाजी करताना एकटा बटलर चमकला. इतर फलंदाजांना सुर गवसला नव्हता, तर बटलरची तुफान फटकेबाजी सुरुच होती. तो शेवटपर्यंत टिकला असता तर भारतीय संघाला महागात पडलं असतं. पण नितीश रेड्डीने घेतलेल्या कॅचमुळे भारताने या सामन्यात कमबॅक केलं. या डावात बटलरने शानदार फटकेबाजी करत ४४ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर इंग्लंडला १३२ धावा करता आल्या.

Nitish Reddy Catch: एकच नंबर! नितीश रेड्डीने हवेत डाईव्ह मारत घेतला भन्नाट कॅच; VIDEO एकदा पाहाच
IND vs ENG 1st T20I: 'वरुण'राजाच्या तडाख्यात इंग्लंड गेला वाहून; भारताला अवघ्या इतक्या धावांची गरज

भारताचा यशस्वी पाठलाग

या सामन्यात इंग्लंडने पहिल्या डावात फलंदाजी करताना १३२ धावा केल्या होत्या. भारतीय संघाला जिंकण्यासाठी १३३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना संजू सॅमसनने ताबडतोड सुरुवात करुन दिली. त्यानंतर अभिषेक शर्माने वादळी अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com