Nitish kumar Reddy: BGT गाजवणाऱ्या नितीशने गुडघे टेकत चढल्या तिरुपती मंदिराच्या पायऱ्या - VIDEO

Nitish Kumar Reddy Viral Video: भारतीय संघाचा स्टार खेळाडू नितीश कुमार रेड्डीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्यात तो गुडघ्यावर बसून पायऱ्या चढताना दिसतोय.
Nitish kumar Reddy: BGT गाजवणाऱ्या नितीशने गुडघे टेकत चढल्या तिरुपती मंदिराच्या पायऱ्या - VIDEO
nitisjh kumar reddytwitter
Published On

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक युवा खेळाडू चमकला, तो म्हणजे अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी. पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघात खेळण्याची संधी मिळाली आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी पदार्पण करण्याची संधीही मिळाली. या संधीचा त्याने चांगलाच फायदा घेतला. पहिल्याच कसोटी सामन्यातील दोन्ही डावात त्याने शानदार ४२-४२ धावांची खेळी केली. याच दौऱ्यावर त्याने शतकी खेळी केली.

ज्यावे्ळी भारतीय संघ अडचणीच होता, त्यावेळी त्याने फलंदाजीत आणि गोलंदाजीतही शानदार कामगिरी करुन भारतीय संघाला कमबॅक करुन दिलं. मात्र भारताला ही मालिका ३-१ ने गमवावी लागली. दरम्यान भारतीय खेळाडू आता मायदेशी परतले आहेत. मायदेशी परतल्यानंतर नितीश कुमार रेड्डीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Nitish kumar Reddy: BGT गाजवणाऱ्या नितीशने गुडघे टेकत चढल्या तिरुपती मंदिराच्या पायऱ्या - VIDEO
Champions Trophy: ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपणार? चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दक्षिण आफ्रिकेने जाहीर केला तगडा संघ

नितीश कुमार रेड्डीची देव दर्शनाला हजेरी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आली नाही. भारताने ही मालिका ३-१ ने गमावली. पण युवा नितीश कुमार रेड्डीने आपल्या शानदार फलंदाजीने सर्वांचीच मनं जिंकली. त्याने आपल्या वडिलांचं स्वप्नं पू्र्ण केलं.

त्याच्या वडिलांनी स्वप्नं पाहिलं होतं की, माझ्या मुलाने देशासाठी खेळावं. आता मुलाने हे स्वप्नं पूर्ण केलं. हे स्वप्नं पूर्ण केल्यानंतर नितीश कुमार रेड्डीने तिरुपती बालाजी देवस्थानाला भेट दिली. यावेळीही गुडघ्यावर बसून पायऱ्या चढताना दिसून आला. त्यानंतर त्याने बालाजीचं दर्शन घेतलं. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Nitish kumar Reddy: BGT गाजवणाऱ्या नितीशने गुडघे टेकत चढल्या तिरुपती मंदिराच्या पायऱ्या - VIDEO
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर! हा खतरनाक खेळाडू करतोय कमबॅक

इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळणार

नितीश कुमार रेड्डीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत तो यशश्वी जयस्वालनंतर दुसरा सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला. आता तो इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिका खेळताना दिसून येणार आहे. त्याला ऑक्टोबर २०२४ मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती.

पदार्पणाच्या सामन्यात त्याला १६ धावा करता आल्या होत्या. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने ताबडतोड फटकेबाजी करत ७४ धावांची खेळी केली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद होऊन माघारी परतला होता. आता तो इंग्लंडविरुद्ध आपला जलवा दाखवताना दिसून येणार आहे. तो इंग्लंडविरुद्ध कशी कामगिरी करतो, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com