Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर! हा खतरनाक खेळाडू करतोय कमबॅक

Afghanistan Squad For ICC Champions Trophy 2025: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेसाठी अफगाणिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे.
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी  अफगाणिस्तानचा संघ जाहीर! हा खतरनाक खेळाडू करतोय कमबॅक
AFGHANISTANTWITTER
Published On

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी अफगाणिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे. या संघात इब्राहिम जदरानला कमबॅक करण्याची संधी दिली आहे. मुख्य बाब म्हणजे संघातील फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानला संघात स्थान देण्यात आलेलं नाही. कारण तो दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो वनडे क्रिकेट खेळताना दिसून येणार नाही.

Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी  अफगाणिस्तानचा संघ जाहीर! हा खतरनाक खेळाडू करतोय कमबॅक
IND vs AUS: BGT गमावताच विराट- रोहित निवृत्ती घेणार? गौतम गंभीर काय म्हणाला?

मुजीब उर रहमान संघाबाहेर झाल्यानंतर, आणखी एक मिस्ट्री गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आलं आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीत एएम गजनफर अफगाणिस्तानकडून मैदानात उतरणार आहे.

गजनफरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला दमदार सुरुवात केली आहे. यासह सिद्दिकुलाह अटलला देखील संघात स्थान देण्यात आलं आहे. नुकताच झिम्बाब्वेविरुद्ध पार पडलेल्या मालिकेत त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. त्याने १५६ धावा करत प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता.

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ ग्रुप बी मध्ये असणार आहे. या गटात अफगाणिस्तानसह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण सारख्या मजबूत संघांचा समावेश आहे. त्यामुळे अफगाणिस्तानला जर पुढच्या फेरीत जायचं असेल तर या संघांना पराभूत करावं लागेल.

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी असा आहे अफगाणिस्तानचा संघ

हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इब्राहिम जादरान, रहमानुल्लाह गुरबाज, सेदिकुल्लाह अटल, रहमत शाह, इकराम अलिखील, गुलबदीन नायब, अजमतुल्लाह उमरजई, मोहम्मद नबी, राशिद खान, एएम गजनफर, नूर अहमद, फजलहक फारूकी, फरीद मलिक, नवीद जादरान.

राखीव खेळाडू: दरविश रसूली, नांग्याल खरोती, बिलाल सामी

Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी  अफगाणिस्तानचा संघ जाहीर! हा खतरनाक खेळाडू करतोय कमबॅक
ICC Champions Trophy: टीम इंडियानंतर आता इंग्लंडने या संघासोबत खेळण्यास दिला नकार; कारणही सांगितलं

असं आहे या स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

19 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, कराची

20 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध भारत, दुबई

21 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, कराची

22 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, लाहोर

23 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध भारत, दुबई

24 फेब्रुवारी- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड, रावळपिंडी

25 फेब्रुवारी- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, रावळपिंडी

26 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध इंग्लंड, लाहोर

17 फेब्रुवारी- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, रावळपिंडी

28 फेब्रुवारी- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लाहोर

1 मार्च - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड, कराची

2 मार्च- न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुबई

4 मार्च- उपांत्य फेरी-1, दुबई

5 मार्च- उपांत्य फेरी-2, लाहोर

9 मार्च - फायनल, लाहोर (भारत अंतिम फेरीत पोहोचल्यास दुबईमध्ये खेळला जाईल)

10 मार्च - राखीव दिव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com