Ind vs Nz Live : लाइव्ह सामन्यादरम्यान चाहते गौतम गंभीरवर भडकले, काय आहे नेमकं प्रकरण? वाचा

Ind vs Nz Final Match : भारत विरुद्ध न्यूझीलंडचा सामना महत्त्वपूर्ण टप्प्यात आहे. अशातच टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. गंभीरला ट्रोल का केले जात आहे? वाचा..
Ind vs Nz Live
Ind vs Nz LiveSaam Tv
Published On

Ind vs Nz Final : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना सुरु आहे. न्यूझीलंडच्या कर्णधाराने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी केली. न्यूझीलंडच्या संघाने २५१ धावा केल्या. त्यानंतर भारतीय खेळाडू फलंदाजीसाठी मैदानात उतरले. सध्या भारताचा रन चेज सुरु आहे. याच दरम्यान टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

गौतम गंभीरने भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान सोशल मीडियावर एक प्रमोशनल पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये एका अ‍ॅपची लिंक मेन्शन केली. पोस्टच्या कॅप्शनमध्ये 'Ro Ko ची जोडी भारताला आणखी एक चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवून देईल का? ट्रेड करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या आणि जिंका भरघोष बक्षीस' असे म्हटले होते.

या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धारेवर धरले आहे. काही यूजर्सनी त्याच्या एका जुन्या पोस्टचा स्कीनशॉट शेअर केला. त्या पोस्टमध्ये तत्कालीन बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर एका अ‍ॅपच्या प्रमोशनवरुन टीका केल्याचे पाहायला मिळते. या संपूर्ण प्रकरणावरुन चाहते गंभीरला ट्रोल करत आहेत.

Ind vs Nz Live
Ind Vs Nz Live : कॅमेरामॅन जोमात, प्रेक्षक कोमात; फायनलमध्ये खेळाडूंपेक्षा या गोष्टींची होतेय चर्चा

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी टीम इंडियाच्या निवडीवरुन गौतम गंभीरवर टीका करण्यात आली होती. वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणाला संघात घेतल्याने अनेकजण गंभीरवर चिडले होते. पण त्याच्या या निर्णयामुळे भारताला प्रचंड फायदा झाला. त्यातही वरुण चक्रवर्ती हा टीम इंडियासाठी लकी ठरला.

Ind vs Nz Live
Ind vs Nz Live : धोनीचा बदला विराटने घेतला, सँटनर आऊट होताच सोशल मीडियावर चर्चांना उधाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com