Ind Vs Nz Live : कॅमेरामॅन जोमात, प्रेक्षक कोमात; फायनलमध्ये खेळाडूंपेक्षा या गोष्टींची होतेय चर्चा

Ind Vs Nz Champions Trophy 2025 : दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना सुरु आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यामध्ये क्रिकेटपटूंपेक्षा कॅमेरामनची अधिक चर्चा होत आहे.
Ind Vs Nz Live
Ind Vs Nz LiveSaam Tv
Published On

Ind Vs Nz Final Match : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना दुबईमध्ये सुरु आहे. या सामन्यामध्ये भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ आमनेसामने आले आहेत. न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यामध्ये आतापर्यंत भारतीय फिरकीपटू गोलंदाज न्यूझीलंडच्या फलंदाजांवर वरचढ ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना पाहण्यासाठी अनुष्का शर्मासह अनेक बॉलिवूड कलाकार दुबईत पोहोचले आहेत. सेलिब्रिटींसह अनेक प्रसिद्ध चेहरे स्टेडियममध्ये पाहायला मिळत आहेत. दरम्यान सामना सुरु असताना क्रिकेटपटूंपेक्षा कॅमेरामॅनची चर्चा होत आहे. कॅमेरामॅन हे मैदानात कमी आणि स्टेडियमच्या आत बसलेल्या चाहत्यांवर अधिक फोकस करत असल्याचे नेटकरी म्हणत आहेत.

सोशल मीडियावर भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यातील कॅमेरामॅन मंडळींची चर्चा होत आहेत. हे लोक खेळाडूंच्या पेक्षा जास्त वेळ चाहत्यांवर फोकस करत आहेत, अशी प्रतिक्रिया लोक सोशल मीडियावर देत आहेत. याबाबत अनेक मीम्स देखील पोस्ट केले जात आहेत. हे मीम्स, व्हिडीओ आणि पोस्ट्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Ind Vs Nz Live
Ind Vs Nz Live : बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड घेतला पण फायनलमध्ये चुकला, श्रेयस अय्यरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

भारतीय फिरकीपटूंची जादू आजच्या सामन्यात पाहायला मिळत आहे. वरुण चक्रवर्तीने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. पुढे कुलदीपने रचिन रविंद्र आणि केन विलियम्सन यांना बाद केले. त्यानंतर रविंद्र जडेजाने टॉम लॅथम आऊट केले. आतापर्यंत न्यूझीलंडचे ४ गडी बाद झाले आहेत.

Ind Vs Nz Live
Ind Vs Nz Live : केन विलियम्सनची विकेट पडताच रोहितच्या बायको-मुलीचा जल्लोष, रिअ‍ॅक्शन Video Viral

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com