Ind Vs Nz Live : बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड घेतला पण फायनलमध्ये चुकला, श्रेयस अय्यरचा 'तो' व्हिडीओ व्हायरल

Ind vs Nz Final : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये श्रेयस अय्यरने रचिन रविंद्रची कॅच सोडली. रचिनला तब्बल दुसऱ्यांदा जीवनदान मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Shreyas iyer catch drop
Shreyas iyer catch dropSaam Tv
Published On

Shreyas Iyer : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. टॉस जिंकत न्यूझीलंडने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडचे दोन्ही सलामीवीर मैदानात उतरले. यंग आणि रवींद्र या दोघांनीही चांगली भागीदारी केली. याच दरम्यान वरुण चक्रवर्तीने टाकलेल्या बॉलवर रचिन रविंद्र बाद होता-होता राहिला. श्रेयस अय्यरच्या हातून रचिनची कॅच सुटली.

न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी ५० धावा केल्यानंतर सातव्या ओव्हरमध्ये रोहित शर्माने वरुण चक्रवर्तीला गोलंदाजीसाठी बोलावले. पहिला बॉल वाईड झाला. त्यानंतर लगेच वरुणने टाकलेल्या बॉलवर रचिन रविंद्रने जोरदार शॉट मारला. बॉल श्रेयस अय्यरकडे पोहोचला. धावत-धावत अय्यरने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या हाताला लागून बॉल दुसऱ्या दिशेला गेला.

श्रेयस अय्यरने कॅच सोडल्यामुळे रचिन रविंद्रला जीवनदान मिळाले. त्याआधी सहाव्या ओव्हरमध्ये मोहम्मद शमीच्या हातूनही रविंद्रचा कॅच सुटला होता. कॅच पकडण्याच्या प्रयत्नांमध्ये शमीच्या हाताला दुखापत झाली. त्याच्या हातातून रक्त वाहू लागल्याचे म्हटले जात आहे. शमीनंतर वरुण चक्रवर्तीची ओव्हर सुरु झाली.

Shreyas iyer catch drop
Rohit Sharma : एक-दोन नाही तर सलग १५ वेळा गमावला टॉस; नकोसा विक्रम नावे होताच काय म्हणाला रोहित शर्मा?

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधला सामना दुबईत खेळला जात आहे. या सामन्यामध्ये टॉस हरत रोहित शर्माने नकोसा विक्रम केला आहे. रोहित सलग १५ व्यांदा वनडे क्रिकेटमध्ये टॉस हरला आहे. विक्रम केल्यानंतर रोहितची प्रतिक्रिया कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली. त्याच्या प्रतिक्रियेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Shreyas iyer catch drop
Ind Vs NZ Final : भारत की न्यूझीलंड, कोण चॅम्पियन होणार? सामन्याआधीच अंदाज आला समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com