Ind Vs NZ Final : भारत की न्यूझीलंड, कोण चॅम्पियन होणार? सामन्याआधीच अंदाज आला समोर

Champions Trophy 2025 Ind Vs Nz Final : दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना कोणता संघ जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ind Vs NZ Final Champions trophy 2025
Ind Vs NZ Final Champions trophy 2025Saam Tv
Published On

Ind Vs NZ Final Match : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्याला काही वेळात सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये हा हायवॉल्टेज सामना खेळला जाणार आहे. टीम इंडिया दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. दरम्यान आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये उत्कृष्ट खेळ केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव केला. उपांत्य फेरीमध्ये भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडचा संघ देखील स्पर्धेमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. उपांत्य फेरीमध्ये त्यांनी दक्षिण आफ्रिकावर मात मिळवली.

Ind Vs NZ Final Champions trophy 2025
IND vs NZ Final : टीम इंडिया खेळणार १४ व्यांदा फायनल, २५ वर्षांपूर्वीचा किवीचा बदला घेण्याचा मौका मौका

दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना सुरु होण्यापूर्वी विजयाचे संकेत गुगलद्वारे देण्यात आले आहेत. भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ सरस असले तरी, आजच्या सामन्यामध्ये भारताचे पारडे जड असल्याचे गुगलने म्हटले आहे. गुगलनुसार, भारत चॅम्पियन बनण्याची शक्यता ६८ टक्के आहे. तरी न्यूझीलंडचा विजय होण्याची शक्यता ३२ टक्के आहे.

Ind Vs NZ Final.jpeg
Ind Vs NZ FinalGoogle
Ind Vs NZ Final Champions trophy 2025
Virat Kohli Injury : किंग कोहलीला नेट्समध्ये गंभीर दुखापत, विराट चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलला मुकणार?

भारताने संपूर्ण स्पर्धेमध्ये प्लेईंग ११ मध्ये फारसा बदल केला नाही. हर्षित राणाच्या जागी रोहितने वरुण चक्रवर्तीला खेळवले. हा एकमात्र बदल भारताच्या प्लेईंग ११ मध्ये करण्यात आला. आजच्या सामन्यामध्येही प्लेईंग ११ मध्ये बदल केला जाणार नाही असा अंदाज वर्तवला जात आहे. लवकरच सामन्याला सुरुवात होईल.

Ind Vs NZ Final Champions trophy 2025
Rohit Sharma: रोहित शर्माच्या निवृत्तीचं गूढ वाढलं; 'अंदर की बात' अखेर समोर, चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर 'असं' घडण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com